
Cctv Video:गेल्या काही वर्षात आरोग्याच्या अनेक समस्या वाढत आहेत.लहान मुलांपासून ते प्रत्येक व्यक्ती काहीना काही आरोग्याच्या समस्यांपासून जात आहेत.अनेकदा या आरोग्याच्या समस्यांनी व्यक्तींना जीव गमावू लागला आहे.ज्यात हृदयविकाराच्या समस्यांचे प्रमाण नागरिकांमध्ये दिसून येते.सध्या या संबंधित घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे,ज्यात एका दुकानदाराला दुकानातच हृदयविकाराचा झटका आलेला आहे.संपूर्ण घटनेचा दुकानातील सीसीसीटीव्हीमध्ये कैद झालेली आहे.
सध्या काही महिन्यांपासून लहान मुलांना शाळेत तर काहींना क्रिकेटच्या मैदानातच हृदयविकाराचा झटका येतो. त्याचे संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहण्यासाठीही मिळत असतात.सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओतही(Video) त्यातील एक आहे.ज्यात दुकान दारासोबत घडलेला प्रकार अतिशय दृदयद्रावक असून मोठ्या प्रमाणात व्हिडिओ चर्चेत आलेला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला दुकान दिसत असून या दुकानातील दुकानदार खु्र्चीवर बसलेला दिसत आहे तर दोन ग्राहक दुकानदाराशी बोलताना दिसत आहेत.काही वेळानंतर बोलता-बोलता दुकानदार दुकानात असलेल्या काउंटवर अंग टाकुन देतो,त्याला पाहून ते ग्राहक त्याच्या दिशेने पाहतात मात्र काही वेळात दुकानदार खुर्चीवरुन खाली कोसळणार असतो तेवढ्यात तिथे सर्व येऊन त्याला पकडतात आणि काही वेळात डॉक्टरकडे घेऊन जातात.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सध्या एक्स या प्लॅटफॉर्मवरील ''@priyarajputlive'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे.व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये,''दुकानदाराचा अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू'',घडलेल्या घटनेचे कारण सांगण्यात आलेले आहे.व्हायरल होत असलेला व्हिडिओ उत्तर प्रदेशातील कासगंज येथील असल्याचे कॅप्शनमधून असल्याचे समजत आहेत.व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी अनेक भावूक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.