Crime News: आधी पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून कुकरमध्ये शिजवले; माजी सैनिकाचे धक्कादायक कृत्य

Hyderabad Crime News: आधी पत्नीची हत्या केली. नंतर तिचे तुकडे केले. तुकडे केल्यानंतर आरोपीनं प्रेशर कुकरमध्ये मृतदेहाचे तुकडे शिजवले आणि तलावात फेकून दिले. ही धक्कादायक घटना हैदराबादमध्ये घडलीय.
Crime News
Crime News yandex
Published On

दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांडामुळे संपूर्ण देश हादरला होता. अशीच एक भयंकर घटना हैदराबादमध्ये घडली आहे. आधी पत्नीची हत्या केली. नंतर तिचे तुकडे केले. तुकडे केल्यानंतर आरोपी पतीनं प्रेशर कुकरमध्ये मृतदेहाचे तुकडे घालून शिजवले. मास आणि हाडं वेगळी करून एका गोणीत गोळा केले आणि तलावात फेकून दिले. या धक्कादायक घटनेनंतर परिसर हादरले असून, आरोपीनं पोलिसांसमोर गुन्हा कबूल केला आहे.

पोलीस निरीक्षक नागराजू यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गुरूमूर्ती (वय वर्ष ४५) हे माजी सैनिक आहेत. सध्या कांचनबाग येथे सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत आहेत. गुरूमूर्ती यांचा १३ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. दोघांना २ मुले आहेत. दोघांचा सुखी संसार सुरू होता. मात्र एके दिवशी दोघांमध्ये टोकाचे भांडण झाले. पत्नीसोबत टोकाचे भांडण झाल्यामुळे आरोपीनं पत्नीची हत्या केल्याचं कबूल केलं.

Crime News
Bollywood Death Threats: कपिल शर्मा, राजपाल यादव आणि रेमो डिसूझाला जीवे मारण्याची धमकी; पाकिस्तानशी कनेक्शन?

आधी कडाक्याचे भांडण झाले, नंतर पत्नीची हत्या केली. बाथरूममध्ये पत्नीचा मृतदेह नेत त्याचे तुकडे केले. तुकडे केल्यानंतर आरोपीनं मृतदेहाचे तुकडे प्रेशर कुकरमध्ये टाकत उकळवून घेतलं. नंतर मास आणि हाडं वेगळे करून तलावात फेकून दिलं. पोलिसांनी केलेल्या तपासात हे प्रकरण समोर आलं. तसेच चौकशी केली असता, पती आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली.

Crime News
Pune Crime: पुण्यात कोयत्या गँगची दहशत कायम, बीटी कवडे रोडवर ५० वाहनांची तोडफोड, पाहा CCTV Video

आठडाभरापूर्वी मृत महिलेच्या कुटुंबियांनी मुलगी हरवली असल्याची तक्रार दाखल केली. तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी मृत महिलेचा शोध घेण्यास सुरूवात केली. मृत महिलेच्या पतीची चौकशी केली असता, आरोपी पतीनं पत्नीची हत्या केल्याचं कबूल केलं. नंतर पत्नीची हत्या कशी केली, याबद्दल माहिती दिली. भांडणातून पत्नीची हत्या केली असल्याचं त्याने सांगितलं. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com