सध्या प्रत्येक क्षेत्रात मोबाईल सह अनेक यंत्राचा वापर होत आहे. तंत्रज्ञान हे व्यक्तीचा फायद्यासाठी वापरले जात असले तरी त्याचा वापर व्यक्तीचा आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक ठरत आहे. मोठ्या व्यक्तीसह चिमुकल्या मुलांकडूनही मोबाईलचा वापर होत आहे. परिणामी मुलांना त्याचे तोट्यांना सामोरे जावे लागत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला या संबंधित अनेक घटना समजून येतात. मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत मुलांना मोबाईलपासून लांब ठेवण्यासाठी खुद्द शिक्षकांनी अनोखी कल्पना शोधून काढलेली आहे.
प्रत्येक पालक (Parents) मुलांच्या सतत मोबाईल वापरण्याच्या सवयीपासून त्रस्त झालेले आहेत. कधी मुलांना ओरडून तर कधी मारुन ही झाले तरी लहान मुलांची सतत मोबाईल वापरण्याची सवय जात नाही. मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ लहान मुलं मोबाईलमुळे काय परिणाम होईल ते अगदी शिक्षकांकडून व्यवस्थितरित्या ऐकत आहेत, असा हा सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ. सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल (Viral) होत असून प्रत्येक नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ यूपीमधील आहे. मात्र यूपीमधील बदाऊन येथील एचपी इंटरनॅशनल स्कूलचा आहे. जिथे शाळेतील शिक्षकांनी मुलांना मोबाईलच्या वापरापासून लांब ठेवण्यासाठी विशेष अशी जनजागृती नाट्य (Drama) केलेले आहे. जिथे व्हायरल व्हिडिओत एक शिक्षिका (Teacher) डोळ्यावर पट्टी बांधून रडताना दिसून येतेय. दुसऱ्या शिक्षिकेने आधीच्या शिक्षिकेला विचारले असता, त्यांनी सांगितले की, मी खूप मोबाईल पाहिल्यापासून डोळ्यातून रक्त येत आहे. हे सांगितल्यानंतर शाळेतील मुले घाबरतात. त्यानंतर शिक्षक त्या मुलांना मोबाईल (Mobile) देतात मात्र, मुलं मोबाईल घेण्यास नकार देतात. सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
व्हायरल (Viral) होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील ''@VikashMohta_IND'' या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ शेअर करत,''मुलांना मोबाईलच्या व्यसनापासून मुक्ती हवी आहे, पहा हा व्हिडिओ..!'' असे कॅप्शनमध्ये (Caption) लिहिण्यात आलेले आहे. व्हिडिओ व्हायरल होताच मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळाले आहे तर अनेक सोशल प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आलेला आहे.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.