Ashok Saraf: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अशोक सराफ यांना जाहीर

Akhil Bharatiya Marathi Natya Parishad Award: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा यंदाचा जीवनगौरव पुरस्कार अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना जाहीर झाला आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अशोक सराफ यांना जाहीर
Ashok SarafSaam Tv

दरवर्षी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनाप्रीत्यर्थ १४ जून रोजी पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात येतो. त्यावेळी रंगकर्मींना त्यांच्या रंगभूमीवरील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येतो. या वर्षी अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना जीवनगौरव पुरस्कार व इतर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. हा पुरस्कार वितरण समारंभ शुक्रवार, दिनांक १४ जून २०२४ रोजी सायं ६.०० वाजता यशवंत नाटय मंदिर, मनमाला टँक रोड, माटुंगा, मुंबई ४०००१६ येथे संपन्न होणार आहे.

या सोहळ्याचे औचित्य साधून यशवंतराव चव्हाण नाटय संकुलाच्या नूतनीकरणानंतर यशवंत नाट्य मंदिर रसिकार्पण सोहळा देखील संपन्न होणार आहे.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अशोक सराफ यांना जाहीर
Sonakshi Sinha About Marriage : दबंग गर्ल आणि झहीरच्या लग्नावरून सोशल मीडियात उलटसुलट चर्चा, सोनाक्षी सिन्हाने एका वाक्यात उत्तर दिलं

हा सोहळा अ.भा.मराठी नाटय परिषदेचे विश्वस्त शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच नाटयसंमेलनाध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योगमंत्री तथा अ.भा.मराठी नाटय परिषदेचे विश्वस्त उदय सामंत, अ.भा.मराठी नाटय परिषदेचे तहहयात विश्वस्त शशी प्रभू, अ.भा.मराठी नाटय परिषदेचे विश्वस्त मोहन जोशी, अशोक हांडे, यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अशोक सराफ यांना जाहीर
Noor Malabika Das News : कलाकारांच्या संघटनेने मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र, अभिनेत्रीच्या प्रकरणी मृत्यूप्रकरणी केली चौकशीची मागणी

नाट्यपरिषद- मुंबई कार्यकर्ता पुरस्कारासाठी गणेश तळेकर, नाट्यपरिषद- शाखा कार्यकर्ता पुरस्कारासाठी प्रशांत जोशी, सर्वोत्कृष्ट एकपात्री पुरस्कारासाठी दिपाली घोंगे, सर्वोत्कृष्ट निवेदक पुरस्कारासाठी शशांक लिमये, गुणी रंगमंच कामगार विजय जगताप, नाट्यसमीक्षक पुरस्कारासाठी संजय देवधर (वृत्तपत्र- देवदूत), बालरंगभूमीवरील उल्लेखनीय कार्यासाठी गोविंद गोडबोले, सर्वोत्कृष्ट प्रायोगिक संस्था पुरस्कारासाठी अभिनय, कल्याण, सर्वोत्कृष्ट व्यवस्थापक पुरस्कारासाठी प्रणित बोडके, रंगभूमी व्यतिरिक्त केलेल्या विधायक कार्यासाठी अशोक ढेरे, सर्वोत्कृष्ट लोककलावंत पुरस्कारासाठी सुनील बेंडखळे, कामगार रंगभूमीवरील सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कारासाठी श्याम आस्करकर, तसेच नाट्य परिषदेच्या शाखेचे विनामूल्य काम करणाऱ्या कार्यकर्त्यासाठी स्व.रितेश साळुंके यांची निवड करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com