Mumbai Local Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Mumbai Local Viral Video: लोकलच्या लेडीज डब्याजवळील ही भयंकर गर्दी बघा; धडकी भरवणारा ठाणे स्टेशनवरचा VIDEO

Thane Railway Station Viral Video: काल संपूर्ण मुंबईत सोसायट्याचा वारा आणि पाऊस पडला. यामुळे रेल्वेचं संपूर्ण वेळापत्रक कोलमडलं होतं. रेल्वे वेळेवर नसल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहना करावा लागला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबईची जान म्हणून लोकल ट्रेनला ओळखले जाते. मुंबईतील प्रत्येक नोकरदार वर्ग हा ट्रेनने प्रवास करतो. कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहचवण्यासाठी ट्रेन हा एकमेव पर्याय असतो. इतर दिवशी वेळेवर कामाच्या ठिकाणी पोहवणारी ट्रेन पावसाळ्यात मात्र खूप उशीरा पोहचते. हवामान बदलामुळे आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ट्रेन खूप उशीरा पोहचतात. असाच पाऊस आणि सोसायट्याच्या वाऱ्याने मुंबईकरांना काल खूप त्रास झाला.

रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं. जवळपास १ ते दीड तास ट्रेन वेळेवर नव्हत्या. यामुळे रेल्वे स्टेशनवर प्रचंड गर्दी झाली होती. या गर्दीत अनेकांचा जीव गुदमरल्याचे दृश्य पाहायला मिळत होते. ठाणे रेल्वे स्टेशनवर महिला डब्ब्याच्या बाजूला एक महिला गर्दीमुळे खाली पडली. गर्दीतील धक्काबुक्कीमुळे ती खाली पडली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ठाणे रेल्वे स्टेशनवर हार्बर लाइन आणि सेंट्रल लाइनच्या ट्रेन असतात. त्यामुळे खूपच गर्दी होते. काल ठाणे रेल्वे स्टेशनवर ट्रेन खूप उशीराने येत होत्या. त्यामुळे सर्वांनाच त्रास झाला. ठाण्यातील ट्रेनमधील महिला डब्ब्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओत ठाणे रेल्वे स्टेशनवर एक ट्रेन प्रवाशांनी गच्च भरलेली दिसत आहे. प्रवाशांनी गच्च भरलेल्या ट्रेनमध्येदेखील इतर प्रवासी चढण्याचा प्रयत्नाना दिसत आहे. याच गर्दीत एक महिला प्रवाशी रेल्वे स्टेशनवर अचानक खाली पडते. सुदैवाने इतर आजूबाजूच्या महिलांनी तिला सावरले आणि बाजूला केले. यामुळे पुढे होणारी हानी टळली, असे म्हणायला हरकत नाही.

ठाणे रेल्वे स्टेशनवरील गर्दीचा हा भयानक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. पावसाळ्यात ट्रेन उशीराने होण्याच्या घटना वारंवार घडतात. संपूर्ण रेल्वेचे वेळापत्रक बिघडते. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. वर्षातील पहिल्या पावसात रेल्वे सेवा संपूर्ण कोडमडली होती. तर पावसाळ्यात नागरिकांचे प्रचंड हाल होणार आहेत, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर येऊ लागल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

Cyber Crime: बॅंकिग फ्रॉड टाळण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

SCROLL FOR NEXT