Crocodile Video: बापरे बाप! चिखलात लपली भली-मोठी मगर; शेपटीवर पाय पडला अन् पाहा थरारक व्हिडिओ

Crocodile Attack Viral Video: मगरीने हल्ला करतानाची दृश्य त्या व्यक्तीच्या हातात असलेल्या कॅमेऱ्यत कैद झालीत. हे फुटेज त्याने आपल्या @jayprehistoricpets या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केलेत.
Crocodile Video
Crocodile VideoSaam TV

जंगल सफारीची आवड अनेक व्यक्तींना असते. त्यासाठी मॅन वर्सेस वाइल्ड आणि डिस्कव्हरी सारख्या चॅनलवर अनेक व्यक्ती जंगल सफारी करताना दिसतात. जंगलात राहून तेथे आलेल्या कठीण समस्येतून आपला जीव कसा वाचवायचा या सर्व गोष्टी यात सांगितल्या जातात. अशात एका व्यक्तीचा जंगल सफारीचा अतिशय भयंकर व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे.

Crocodile Video
Pressure Cooker Coffee: फिल्टर कॉफीनंतर आता चक्क प्रेशर कुकरमध्ये बनवली कॉफी;VIDEO VIRAL

या व्हिडिओमध्ये एका भल्यामोठ्या मगरीने थेट एका व्यक्तीवर हल्ला केलाय. मगरीने हल्ला करतानाची दृश्य त्या व्यक्तीच्या हातात असलेल्या कॅमेऱ्यत कैद झालीत. हे फुटेज त्याने आपल्या @jayprehistoricpets या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केलेत. मगरीसोबत आलेल्या अनुभवाचा व्हिडिओ पोस्ट करत त्याने त्यावेळी घटलेला प्रसंग कॅप्शनध्ये देखील शब्दांत सांगितला आहे.

शुटींग करताना कॅमेरामॅनला काही भान नसतं असं तुम्ही ऐकलं असेल, ते खरं असावं. काल मी जंगलात शुटींग करत होतो. त्यावेळी एक खुप मोठी मगर समोर असलेल्या चिखलात लपून बसली होती. शुटींगकरताना कॅमेरा सुरुच होता. मी त्या चिखलासून जाणार होतो. मी जसा जवळ आलो तशी मगरीने माझ्यावर झडप घातली.

सुदैवाने मगरीच्या या हल्ल्यातून मी वाचलो आहे. मगरीने हल्ला करताच हा व्यक्ती तेथून धूम ठोकली. जय ब्रेवर असं या व्यक्तीचं नाव आहे. जय नेहमीच हिंस्र प्राण्यांच्या सानिध्यात राहतात. साप, पाल, घोरपड, अजगर, मगरी, मोठ-मोठे कासव अशा सरपटणाऱ्या प्राण्यांवर जय यांचं विशेष प्रेम आहे.

या प्राण्यांना होणाऱ्या अडचणी त्यांचे दैनंदिन जिवन या सर्वांबाबत जय माहिती देत असतात. काही दिवसांपूर्ण ते अजगराची अंडी एका बॉक्समध्ये ठेवत होते. त्यावेळी अजगराने त्यांच्यावर हल्ला केला होता, असा व्हिडिओ त्यांनी आपल्या इंस्ट्राग्राम उकाउंटवर पोस्ट केला होता. यासह महाकाय विशाल हात्तीसोबत पाण्यात मस्ती करतानाचा देखील त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता.

Crocodile Video
Maharashtra Politics: शिरूर लोकसभेत मतदारांच्या मतांची किंमत ५०० रुपये, कोल्हेंनी VIDEO शेअर करत केला गंभीर आरोप

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com