Maharashtra Politics: शिरूर लोकसभेत मतदारांच्या मतांची किंमत ५०० रुपये, कोल्हेंनी VIDEO शेअर करत केला गंभीर आरोप

Shirur Lok Sabha constituency: शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून पैशाचा थेट वापर झाल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी केला आहे.
शिरूर लोकसभेत मतदारांच्या मतांची किंमत ५०० रुपये, कोल्हेंनी VIDEO शेअर करत केला गंभीर आरोप
Amol KolheSaam Tv

Amol Kolhe News:

आज लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान प्रक्रिया पार पडली. यातच राज्यातील 11 जागांवर मतदान झालं. यातच शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून पैशाचा थेट वापर झाल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी केला आहे. अमोल कोल्हे यांनी एक व्हिडिओ शेअर करत सत्ताधारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांवर हा आरोप केला आहे.

अमोल कोल्हे यांनी इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ''500 रुपये एका मताची किंमत लावून लोकशाही आणि मतदार राजाची थट्टा करण्याचं काम महायुतीचे डमी उमेदवार आणि सत्ताधारी पक्षांकडून होत आहे. पण तरीही झोपलेल्या प्रशासनाला जाग येत नाही.'' ते म्हणाले आहेत की, ''मायबाप जनता सुज्ञ आहे, मतदानातून योग्य तो धडा त्यांना विकत घेऊ पाहणाऱ्यांना शिकवतील.''

शिरूर लोकसभेत मतदारांच्या मतांची किंमत ५०० रुपये, कोल्हेंनी VIDEO शेअर करत केला गंभीर आरोप
Sushil Kumar Modi: बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, वयाच्या ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मतदानाच्याआधी नगरमध्ये पैशांचा पाऊस

दरम्यान, मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात पैसे वाटण्यावरून बारामतीत दोन्ही राष्ट्रवादींमध्ये जोरदार रणकंदन माजलं होतं. आता मतदानाच्या चौथ्या टप्प्यात हा पैशांचा पाऊस नगरमध्ये पडलाय. नगरच्या पारनेरच्या रस्त्यावर बॅगेतून पडलेल्या नोटांच्या बंडलचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानं मोठी खळबळ माजलीय. यावरून लंके आणि विखेंचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले.

सुजय विखेंच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याचा आरोप निलेश लंकेंनी केलाय. यासंदर्भातला व्हिडिओत लंकेंनी ट्विट केलाय. याप्रकरणी भाजपचे पारनेर तालुकाध्यक्ष राहुल शिंदे आणि विजय औटी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र ही एकच बाजू असून खरा व्हिडिओ बाहेर येण्याची गरज सुजय विखेनी बोलून दाखवलीय.

शिरूर लोकसभेत मतदारांच्या मतांची किंमत ५०० रुपये, कोल्हेंनी VIDEO शेअर करत केला गंभीर आरोप
Maharashtra Politics 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हावर उद्या सुनावणी; ऐन निवडणुकीत कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष

यानिमित्तानं सुजय विखेंनी 2019 प्रकरण उकरून काढत रोहित पवारांवर निशाणा साधलाय. गेल्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवारांचे कार्यकर्ते पैसे वाटताना पकडले गेले होते असा दावा विखेंनी केलाय. तर विखेंनी नको तो विषय काढल्यामुळे सध्या घडलेला प्रकार त्यांना मान्य असल्याचाच पलटवार रोहित पवारांनी केला. अहमदनगरमध्ये मतदानाच्या आदल्यारात्री घडलेल्या प्रकारामुळे नगरमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलं...धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असाच नगरमध्ये प्रचार सुरू होता. मतदानाच्या पूर्वसंध्येला याचा नगरकरांना अनुभव आलाय. आता निवडणूक आयोग याबाबत काय कारवाई करणार याकडे लक्ष लागलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com