Maharashtra Politics 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हावर उद्या सुनावणी; ऐन निवडणुकीत कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष

Sharad Pawar Vs Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार यांना देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे.
Maharashtra Politics 2024
Maharashtra Politics 2024Saam Digital
Published On

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार यांना देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. ही सुनावणी न्यायमूर्ती सुर्यकांत आणि न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांच्या पीठासमोर होणार आहे. पक्ष आणि घड्याळ चिन्ह आयोगाने एकतर्फी अजित पवार यांना दिल्याचं शरद पवार गटाने याचिकेत म्हलटं आहे. मागच्या सुनावणीवेळी कोर्टाने अजित पवार यांना हे प्रकरण सुप्रीम कोर्टात न्यायप्रविष्ट आहे अशा जाहिराती देण्याचे निर्देश दिले होते. निवडणुका सुरू असताना उद्या होणाऱ्या सुनावणीत कोर्ट काही नवी दिशा देत का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com