मुंबईच्या उपनगरांमध्ये राहणारा प्रत्येक चाकरमानी आपल्या पोटापाण्यासाठी मुंबईत नोकरी करतो. वाढत्या महागाईमुळे कमी खर्चातील प्रवासासाठी अनेकजण लोकल ट्रेनने प्रवास करतात. लोकल ट्रेनचा प्रवास सर्वांसाठीच धकाधकीचा असतो. या प्रवासात आता दिवा रेल्वे स्थानकातील एक व्हिडिओ समोर आला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काही व्यक्ती या जिन्यावरून जात आहेत. सरकता जिना अचानक उलट्या दिशेने फिरला आहे. त्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ झालिये. काय करावे काय नाही सुचत नसल्याने जमेल तसं व्यक्ती खाली उतरत असलेल्या जिन्यावरून वरती चढत आहेत. हा संपूर्ण प्रकार स्टेशवर असलेल्या व्यक्तींनी आपल्या फोनमध्ये कैद केला आहे. तसेच रेल्वे स्थानकात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये देखील हा व्हिडिओ कैद झाला आहे.
नेमकं काय घडलं
मिळालेल्या माहितीनुसार, दिवा रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि दोनच्यामध्ये मधल्या ब्रिजला जोडण्यासाठी हा सरकता जिना म्हणजेच एस्केलेटर बसवण्यात आलं आहे. जिना चढताना उतरताना दम लागतो. त्यात या जिन्यावरून आरामात वरती किंवा खाली जाता येते. वयोवृद्ध नागरिकांना याचा सर्वाधिक फायदा होतो. मात्र दिवा रेल्वे स्थानकात रेल्वे प्रशासनाचा हा भोंगळ कारभार पाहून प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
वरती जाणारा हा जिना आधी बंद होता. त्यामुळे नागरिक पायी चालत येथून वर जात होते. अचानक जिना सुरू झाला. मात्र तो वरती न जाता खाली जाऊ लागला. यावेळी काही जन उलट दिशेनेच वरती चढू लागले. आता असे घडत असताना प्रवाशांची चांगलीच धांदळ उडाली होती. त्यामुळे येथे चेंगराचेंगरी होण्याची भीती देखील होती. मात्र काही प्रवाशांनी वेळीच हा जिना थांबवला. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडली नाही.
सोशल मीडियावर @Saurav S.Adhangale या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. सध्या व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. नेटकरी तसेच दिव्यातील अन्य प्रवाशांनी यावर संताप व्यक्त केला आहे. तसेच काहींनी हसण्याचे ईमोजी शेअर केले आहेत. दिवेकरांचा पॅटर्नच वेगळा असतो, अशी कमेंट एकाने केलीये. दिव्या खाली अंधार, दोन्ही जिने बंद असतात सकाळी वरती जातानाचा आणि रात्री खाली उतरतानाचा जिना बंद असतो, अशी कमेंटही तेथीलच एका नेटकऱ्याने केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.