Viral Video Of Delhi Boy: वडील जग सोडून गेले, आईनेही वाऱ्यावर सोडले; १० वर्षांच्या जसप्रीतचा संघर्ष पाहून आनंद महिंद्रा मदतीला धावून आले

Delhi Boy Jaspreet Viral Video: वयाच्या 10 व्या वर्षी ब्रेंट्युमरमुळे बाप जग सोडून गेला. बाप नाही म्हणून आईनेही हात झटकले आणि लेकरांना वाऱ्यावर सोडून माहेर गाठलं. वडिल गेले आईने साथ सोडली. त्यानंतर 10 वर्षांच्या जसप्रीतचा संघर्ष सुरु झाला.
Viral Video Of Delhi Boy
Viral Video Of Delhi BoySaam Tv
Published On

प्रसाद जगताप, साम डिजिटल

वयाच्या 10 व्या वर्षी ब्रेंट्युमरमुळे बाप जग सोडून गेला. बाप नाही म्हणून आईनेही हात झटकले आणि लेकरांना वाऱ्यावर सोडून माहेर गाठलं. वडिल गेले आईने साथ सोडली. त्यानंतर 10 वर्षांच्या जसप्रीतचा संघर्ष सुरु झाला. 14 वर्षांच्या बहीणीची काळजी आणि पोटाचं खळगं भरण्यासाठीच्या संघर्षाने या 10 वर्षांच्या जसप्रीतला खूप लवकर जबाबदार बनवलंय. ज्या वयातले मुलं आपल्या आई वडिलांजवळ चॉकलेट आणि खेळण्यांसाठी हट्ट करतात. त्याच वयात या लेकराने आपल्या बहीणीची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतलीये. दिवसा शाळा आणि रात्री काम करणाऱ्या या मुलाच्या स्टोरीने अनेकांना खूप काही शिकवलंय. असंख्य संकटांशी लढणाऱ्या करणाऱ्या हा मुलाच्या मदतीला आता खुद्द आनंद महिंद्रा धावून आलेत. त्यांनी या मुलाच्या शिक्षणाचा खर्च करण्याची तयारी दाखवली आहे. याचाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

जबाबदारी खूप लवकर आपलं बालपण हिरावते, हे दाखवणारी ही दृष्य आहेत.जे पाऊलं पाठीवर दप्तर घेऊन शाळेच्या दिशेला गेली पाहीजे. तेच पाऊल आपलं आणि आपल्या बहीणीचं पोट भरायला रोज संध्याकाळी दिल्लीच्या तिलक नगरात वळतात. ज्या हातात खेळणी आणि चॉकलेट आली पाहीजेत. तेच हात दोन पैसे कमवायला तापलेल्या तव्याचे कितीतरीवेळा चटके झेलतात.

बाप गेला, आईने घर सोडलं.. तरीही संकटांना धैर्याने तोंड देणाऱ्या जसप्रीतचा हा संघर्ष बिझनेस टायकून आनंद महिंद्रांनाही भावलंय.. त्यांनी जसप्रितचा हा व्हिडीओ आपल्या एक्स अकांऊटवरुन शेअर करत त्यांचा शोध सुरु केलाय. पण, 10 वर्षांत्या जसप्रीतची ही झुंजार कहाणी मीस्टर सिंग फूड हंटर या इन्स्टाग्राम पेजवरुन सरबजीत सिंग यांनीच पहिल्यांदा जगासमोर आणलीये. त्यांचाच व्हिडीओ आनंद महिंद्रांनीही आपल्या ट्विटर आकाऊंटवरुन पोस्ट केलाय.

'गुरु गोविंदसिंहका पुतर है.. जब तक हिंमत है.. तब तक लढांगा..' असं म्हणाणाऱ्या जसप्रीतने सोशल मिडीयावर अनेकांची मने जिंकलीयेत.. बापाने जग जोडलं.. आईने घर सोडलं.. पण, जसप्रीतने हिंमत सोडली नाही.. बापाचा व्यवसाय तो वयाच्या 10व्या वर्षात शिकला.. आणि आजही जसप्रीत त्याच व्यवसायाच्या बळावर स्वाभिमानाने जगतोय. जसप्रीत फक्त व्यवसायच करतोय असं नाही. तो कामाबरोबर शिक्षणही करतोय. आता जसप्रीतवर आनंद महिंद्रांची नजर पडलीये.त्यांनी जसप्रीतच्या धैऱ्याचं कौतूक केलंय.आणि त्यांचा शोध सुरु केलाय.

Viral Video Of Delhi Boy
Delhi Metro: अगोदर बाचाबाची मग थेट हातच उचलला; मेट्रोमध्ये जोडप्याचं कडाक्याचं भांडण, VIDEO व्हायरल

सगळंकाही असूनही काहीच न करणाऱ्या कितीतरी लोकांना जसप्रीतची ही स्टोरी धगधगतत्या विस्तवासारखी वाटेल ज्यांचं जबादारीने बालपण हिरावलं अशा लोकांना जसप्रीतमध्ये स्वत:चा चेहरा दिसेल.. पण, ज्यांना खरंच काहीतरी करायची इच्छाशक्ती आहे अशा लोकांना जसप्रीत प्रेरणेने ओतप्रोत भरलेला धैऱ्याचा झराच वाटेल.. आनंद महिंद्रा लवकरच जसप्रीतशी संपर्क करतील.. आणि नाहीच केला. तरी जसप्रीतला जगण्याचं गमक मिळालंच आहे म्हणा.. सरतेशेवटी काय? तर आपल्याला संकटांना पाहून रडणारा नाही लढणारा जसप्रीत बनता आलं पाहीजे. बस्स..म्हणजे मिळवलं..

Viral Video Of Delhi Boy
Viral Video : उन्हाचा पारा वाढला, महिलेने थेट स्कूटीच्या सीटवर बनवले गरमागरम डोसे, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com