Delhi Metro: अगोदर बाचाबाची मग थेट हातच उचलला; मेट्रोमध्ये जोडप्याचं कडाक्याचं भांडण, VIDEO व्हायरल

Delhi Metro Couple Fight Video : दिल्ली मेट्रोमध्ये एका जोडप्याचं भांडण झालं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Delhi Metro Fight Video
Delhi Metro Fight VideoYandex

दिल्ली मेट्रोमधील एक नवीन व्हिडिओ अलीकडे सोशल मीडियावर वेगात व्हायरल होत आहे. दिल्ली मेट्रोमध्ये एका जोडप्याचं भांडण झालं आहे. या व्हिडिओमध्ये एक तरूण आणि तरूणी इतर प्रवाशांसमोर भांडताना (Delhi Metro Fight Video) दिसत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसतंय की, त्या दोघांमध्ये जोरदार भांडण सुरू आहे. अगोदर त्या दोघांमध्ये शाब्दिक वाद होतो. त्यानंतर तरूणी तिच्या मनाप्रमाणे त्या तरूणाला मारहाण करण्यास सुरुवात करते.

काही वेळाने तो तरूणही त्या मुलीवर हात उचलत असल्याचं दिसत आहे. हा व्हायरल व्हिडिओ नेमका कोणत्या स्थानकावरील आहे, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. व्हायरल व्हिडिओमध्ये तो तरूण त्या मुलीला सांगत आहे की, येथे हात उचलु नको. हे सार्वजनिक ठिकाण (Delhi Metro Couple Fight) आहे. यानंतर ती तरूणी थोडी पुढे सरकते. यावरून पुन्हा त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची होताना दिसत आहे. त्यांचा वाद काही संपण्याचं नाव घेत नाहीये.

खरं तर, अशी भांडणं दिल्ली मेट्रोमध्ये नवीन नाहीत. यापूर्वी देखील अशा अनेक घटना समोर आलेल्या आहेत. या व्हिडिओमध्ये दोघेही एकमेकांना मारत असल्याचं दिसत (Boyfriend Girlfriend Dispute) आहे. सार्वजनिक ठिकाणी जोडप्यांमध्ये बाचाबाची होताना दिसते. अनेकदा शाब्दिक वार वाढत जातो अन् त्यांच्यात तुंबळ मारहाण झाल्याच्या देखील घडतात.

Delhi Metro Fight Video
Delhi Metro Video: दिल्ली मेट्रोत चाललयं काय? प्रवाशांच्या गर्दीत तरुणींची रंगपंचमी अन् अश्लिल डान्स; संतापजनक VIDEO

दिल्लीत मेट्रोमध्ये कोण डान्स करतं, कोण सायकल चालवतं, तर अनेकजण जागेवरून भांडताना देखील दिसतात. आता हे दोघेजण एकमेकांशी भांडत आहे, एकमेकांना मारत देखील (Viral Video) आहेत. यांच्या या भांडणावर अनेक नेटकऱ्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडिओ ४९ सेकंदाचा आहे. तो बाबा बनारस नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. दिल्ली मेट्रो हे या ग्रहावरील सर्वात मनोरंजक ठिकाण आहे, असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलं आहे.

Delhi Metro Fight Video
Delhi Metro Video : दिल्ली मेट्रोत लेडीज कोचमध्ये मद्यापी तरुणाची एन्ट्री; महिलांनी केलं असं काही, VIDEO जोरदार व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com