Police Constable Viral Video: सलाम तुझ्या जिद्दीला! दिल्ली पोलिस महिला कर्मचारी बाळाला पाठीवर घेऊन करतायत काम; VIDEO VIRAL

Delhi Police Constable Viral Video: आई मुलाचे नाते हे जगातील सर्वात सुंदर नाते असल्याचे सर्वजण मानतात. आई आपल्या लेकरासाठी काहीही करायला तयार असते. असाच आई लेकाचा सुंदर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Delhi Police Constable Viral Video
Delhi Police Constable Viral VideoSaam Tv

आई मुलाचे नाते हे जगातील सर्वात सुंदर नाते असल्याचे सर्वजण मानतात. आई आपल्या लेकरासाठी काहीही करायला तयार असते. आईसाठी आपले मुल काळजाचा तुकडा असतो. परंतु अनेकदा कामासाठी आपल्या मुलाला घरी ठेवून आईला जावे लागते.काम करणाऱ्या प्रत्येक स्त्रीला आपल्या मुलाला काही काळासाठी लांब ठेवावे लागते. कामाच्या ठिकाणी मुलाला घेऊन जाणे अनेकदा शक्य नसते. परंतु आई कितीही कामात व्यस्थ असली तरीही तिचे लक्ष मुलाकडे असते. त्यामुळेच एका महिला पोलिस कर्मचाऱ्याला मदत करण्यासाठी तिचे लहान बाळ पोलिस ठाण्यात आले आहे. याचाच एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हायरल फोटोमध्ये एक महिला पोलिस कर्मचारी आपल्या लहान बाळाला सोबत घेऊन काम करताना दिसत आहे. महिला पोलिस कर्मचाऱ्याने आपल्या बाळाला पाठीवर बांधलेले दिसत आहे. बाळाला पाठीवर घेत ती महिला कॉम्प्युटरवर काहीतरी काम करताना दिसत आहे. मुलाला सोबत घेऊन काम करणाऱ्या या महिलेचे सोशल मीडियावर प्रचंड कौतुक करत आहेत.

DelhiPolice या अकाउंटवरुन हा फोटो शेअर करण्यात आला आहे. त्यावर पोलिसांनी कॅप्शन दिले आहे की, आज ओकारने आपल्या आईला कामाच्या ठिकाणी सोबत करण्याचा निर्णय घेतला आहे. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Delhi Police Constable Viral Video
CCTV Footage: धक्कादायक! टोलचे पैसे द्यायचे नव्हते, महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर थेट चढवली कार; घटना CCTV कॅमेरात कैद

दिल्ली पोलिसांनी मदर्स डेनिमित्त हा फोटो शेअर करण्यात आला होता. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. आई ही या जगातील सर्वात सुंदर गोष्ट आहे, फक्त आईच मुलाला पाठीवर घेऊन काम करु शकते, अशा कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहेत.

Delhi Police Constable Viral Video
Bullet Fire Video: धावत्या बुलेटने घेतला पेट, आग विझवताना भीषण स्फोट; १० जण होरपळले|काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com