Bullet Fire Video: धावत्या बुलेटने घेतला पेट, आग विझवताना भीषण स्फोट; १० जण होरपळले|काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO

Bullet Catches Fire and Blast Viral Video: हैद्राबादमध्ये धावत्या बुलेटने पेट घेतल्यानंतर स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून ९ जण होरपळल्याचे सांगण्यात येत आहे
Bullet Catches Fire and Blast Viral Video:
Bullet Catches Fire and Blast Viral Video:Saamtv

हैद्राबाद: इलेक्ट्रिक बाईक तसेच धावत्या कारने पेट घेतल्याच्या घटना वारंवार पाहायला मिळतात. उन्हामुळे गाडी गरम होऊन अनेकदा आग लागल्याचे प्रकार घडतात. मात्र हैद्राबादमध्ये धावत्या बुलेटने पेट घेतल्यानंतर स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून ९ जण होरपळल्याचे सांगण्यात येत आहे. या थरारक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ही संपूर्ण घटना हैद्राबादच्या मोगलपुरा भवानीपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. परिसरातील व्होल्टा हॉटेलजवळ चालत्या बुलेटच्या इंजिनला अचानक आग लागली. आग लागताच चालकाने दुचाकीवरून उडी मारून जीव वाचवला. मात्र यावेळी घटनास्थळी उपस्थित सर्व लोकांनी दुचाकीची आग विझवण्यास सुरुवात केली. हीच आग विझवताना गाडीचा अचानक स्फोट झाला. या स्फोटामध्ये १० जण गंभीररित्या होरपळले होते. ज्यामधील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

गाडीने पेट घेताच आगीने रौद्ररुप धारण केले. ज्यानंतर रस्त्याच्या मधोमध काही जण आग विझवण्याचा प्रयत्न करत होते. आग विझवण्यासाठी लोकांनी दुचाकीवर पाणी व वाळू टाकण्यास सुरुवात केली. अचानक बाईकच्या इंधन टाकीत मोठा स्फोट झाला आणि शेजारी उभे असलेले लोक गंभीर जखमी झाले. यांपैकी आज सकाळी रुग्णालयात उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला

Bullet Catches Fire and Blast Viral Video:
CBSE 12th Results 2024: बारावीचा निकाल जाहीर, सीबीएसईत मुलींची बाजी; असा पाहा निकाल

दरम्यान, कडक उन्हाळ्यामुळे की वाहनांंमध्ये आग लागण्याच्या घटना घडत आहेत. या बुलेटला आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. मात्र गाडी गरम झाल्यामुळेच ही आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तसेच लोकांनी वाळू टाकल्यामुळे टाकीचा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Bullet Catches Fire and Blast Viral Video:
Sonia Gandhi: 'महिलांना वर्षाला १ लाख रुपये देणार..', सोनिया गांधींची सर्वात मोठी घोषणा; काय आहे महालक्ष्मी योजना?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com