CBSE 12th Results 2024: बारावीचा निकाल जाहीर, सीबीएसईत मुलींची बाजी; असा पाहा निकाल

cbse class 12 board exam result : गेल्या काही दिवसांपासून सीबीएसईच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या निकालाबाबतच्या तारखांबाबत सातत्याने सोशल मीडियात बनावट परिपत्रके फिरत हाेती.
cbse class 12 board exam results declared today
cbse class 12 board exam results declared todaySaam Digital
Published On

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) आज त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर इयत्ता 12वी परिक्षेचा निकाल जाहीर केला आहे. यंदाचा निकाल 87.98 इतका असून हा गत वर्षीपेक्षा 0.65 टक्क्यांनी जास्त लागला आहे. गतवर्षीचा निकाल 87.33 टक्के इतका हाेता. सीबीएसईच्या 12वीची परिक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना (CBSE 12th result) त्यांचा निकाल https://cbseresults.nic.in/ या संकेतस्थळावर पाहण्यास सीबीएसईने उपलब्ध केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सीबीएसईच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या निकालाबाबतच्या तारखांबाबत सातत्याने सोशल मीडियात बनावट परिपत्रके फिरत हाेती. त्यावेळी सीबीएसईने निकालाची तारीख तसेच अन्य माहिती अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल असे स्पष्ट केले हाेते. काेणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले हाेते. (Maharashtra News)

cbse class 12 board exam results declared today
Abhijit Pakhare UPSC Success Story : जिद्दीच्या जोरावर अभिजित पाखरेंची यशाला गवसणी,चारवेळा अपयश तरीही जिद्द कायम ठेवत यूपीएससी परीक्षेत मिळवलं यश

आज सीबीएसईने 12वीचा निकाल जाहीर केला आहे. यामध्ये 24,000 हून अधिक विद्यार्थ्यांनी 95 टक्क्यांपेक्षा जास्त, 1.16 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले आहेत.

यंदा 91.52 टक्के मुलींनी तर 85.12 टक्के मुलांनी परिक्षेत यश मिळविले आहे. मुलींचे मुलांपेक्षा 6.4 टक्के जादा उत्तीर्ण हाेण्याचे प्रमाण आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

cbse class 12 board exam results declared today
मतदान होताच नीरेचे पाणी बंद, पंढरपूरसह माळशिरसचे शेतकरी हतबल; रणजितसिंह मोहिते पाटलांनी घातलं लक्ष, साेमवारी...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com