Sonia Gandhi: 'महिलांना वर्षाला १ लाख रुपये देणार..', सोनिया गांधींची सर्वात मोठी घोषणा; काय आहे महालक्ष्मी योजना?

Sonia Gandhi Mahalaxmi Scheme For Women: काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधतानाच महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. काँग्रेस सरकार सत्तेत येताच महिलांना वर्षाला एक लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे.
Sonia Gandhi: 'महिलांना वर्षाला १ लाख रुपये देणार..',  सोनिया गांधींची सर्वात मोठी घोषणा; काय आहे महालक्ष्मी योजना?
Sonia Gandhi Mahalaxmi Scheme For Women: SAAM Tv
Published On

दिल्ली, ता. १३ मे २०२४: देशभरातील ९६ मतदार संघांमध्ये लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे. लोकसभा निवडणुकांचे आणखी तीन टप्पे शिल्लक असतानाच काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधतानाच महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. या संदर्भात एक व्हिडिओ शेअर करत सोनिया गांधी यांनी काँग्रेस सरकार सत्तेत येताच महिलांना वर्षाला एक लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे.

काय म्हणाल्यात सोनिया गांधी?

नमस्कार माझ्या प्रिय बहिणींनो. स्वातंत्र्य लढ्यापासून ते आधुनिक भारताच्या निर्मितीत महिलांचे मोठे योगदान आहे. मात्र, आज महिलांसमोर प्रचंड महागाईचे संकट उभे आहे. त्यांच्या मेहनतीला आणि तपश्चर्येला न्याय देण्यासाठी काँग्रेसने क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. काँग्रेसच्या 'महालक्ष्मी' योजनेंतर्गत गरीब कुटुंबातील महिलेला आम्ही दरवर्षी 1 लाख रुपये देणार आहोत, असे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.

महालक्ष्मी योजनेची घोषणा

तसेच आमच्या या गॅरंटीने कर्नाटक आणि तेलंगणामधील कोट्यवधी कुटुंबांचे जीवन आधीच बदलून टाकले आहे. मनरेगा असो, माहितीचा अधिकार असो, शिक्षणाचा अधिकार असो किंवा अन्न सुरक्षा असो काँग्रेस पक्षाने आमच्या योजनांद्वारे कोट्यवधी भारतीयांना बळ दिले आहे. महालक्ष्मी योजना ही आपले कार्य पुढे नेण्याची नवीन गॅरंटी आहे. या कठीण काळात काँग्रेसचा हात तुमच्या पाठीशी आहे आणि हा हात तुमची परिस्थिती बदलेल, असा विश्वास मी तुम्हाला देऊ इच्छिते, असे सोनिया गांधी म्हणाल्यात.

Sonia Gandhi: 'महिलांना वर्षाला १ लाख रुपये देणार..',  सोनिया गांधींची सर्वात मोठी घोषणा; काय आहे महालक्ष्मी योजना?
Swati Maliwal: ब्रेकिंग! CM केजरीवाल यांच्या पीएकडून खासदार स्वाती मालीवाल यांना मारहाण? पोलीस मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात प्रचार सभांचा धडाका लावला असतानाच आता इंडिया आघाडीकडूनही मुंबईमध्ये विराट सभेचे आयोजन करण्यात आले आहे. महाविकास आघाडीची १७ तारखेला मोठी सभा होणार आहे. या सभेसाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उद्धव ठाकरे, शरद पवार, उपस्थित राहणार असल्याची माहिती काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला यांनी दिली आहे.

Sonia Gandhi: 'महिलांना वर्षाला १ लाख रुपये देणार..',  सोनिया गांधींची सर्वात मोठी घोषणा; काय आहे महालक्ष्मी योजना?
Nashik Loksabha: हेमंत गोडसेंसाठी CM शिंदे मैदानात! मध्यरात्री मोठी खलबतं; मुख्यमंत्र्यांकडून नाराजांच्या मनधरणीचे प्रयत्न

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com