Swati Maliwal: ब्रेकिंग! CM केजरीवाल यांच्या पीएकडून खासदार स्वाती मालीवाल यांना मारहाण? पोलीस मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल

Delhi Breaking News: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी पी.ए विभव कुमार यांनी मारहाण केल्याची माहिती दिल्ली पोलिसांना दिली. या गंभीर आरोपाने दिल्लीच्या राजकारणात पुन्हा खळबळ उडाली आहे.
Swati Maliwal: ब्रेकिंग! CM केजरीवाल यांच्या पीएकडून खासदार स्वाती मालीवाल यांना मारहाण? पोलीस मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल
Swati Maliwal NewsSaam Tv

दिल्ली, ता. १३ मे २०२४

आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार तसेच दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या स्विय सहायकाने मारहाण केल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी पी.ए विभव कुमार यांनी मारहाण केल्याची माहिती दिल्ली पोलिसांना दिली. या गंभीर आरोपाने दिल्लीच्या राजकारणात पुन्हा खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आपच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या स्वीय सहायकाविरोधात गंभीर आरोप केल्याने दिल्लीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. केजरीवाल यांचे पी. ए विभव कुमार यांच्याकडून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मारहाण करण्यात आल्याचा दावा स्वाती मालीवाल यांनी केला आहे.

आज सकाळी 9 वाजता केजरीवाल यांच्या निवासस्थानी मारहाण झाल्याची माहिती पोलिसांना फोन करून दिली. पोलिसांना फोन केलेल्या व्यक्तीने स्वाती मलिवाल असल्याचा दावा केला. या फोननंतर दिल्ली पोलिसांचे पथक चौकशीसाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहे.

Swati Maliwal: ब्रेकिंग! CM केजरीवाल यांच्या पीएकडून खासदार स्वाती मालीवाल यांना मारहाण? पोलीस मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल
Shivsena Crisis News: तारीख पे तारीख! शिवसेना पक्ष आणि आमदार अपात्रतेची 'सुप्रीम' सुनावणी पुन्हा लांबणीवर? विधानसभेच्या तोंडावर निकाल येणार?

दरम्यान, या मारहाणीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. तसेच खासदार स्वाती मालीवाल यांनी वैद्यकीय तपासणी करण्यास नकार दिला आहे. याबाबतची लेखी तक्रार देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दिल्ली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Swati Maliwal: ब्रेकिंग! CM केजरीवाल यांच्या पीएकडून खासदार स्वाती मालीवाल यांना मारहाण? पोलीस मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल
Dilip Walse Patil: 'आरोप प्रत्यारोप, भावनिक आवाहन लोकशाहीला शोभणारं नाही', दिलीप वळसे पाटलांचा राज्यकर्त्यांना टोला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com