Shivsena Crisis News: तारीख पे तारीख! शिवसेना पक्ष आणि आमदार अपात्रतेची 'सुप्रीम' सुनावणी पुन्हा लांबणीवर? विधानसभेच्या तोंडावर निकाल येणार?

Shivena Crisis Uddhav Thackeray Vs Eknath Shinde: निकालाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार होती. मात्र सुप्रीम कोर्टातील या दोन्ही प्रकरणाची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.
Shivsena Crisis News: तारीख पे तारीख! शिवसेना पक्ष आणि आमदार अपात्रतेची 'सुप्रीम' सुनावणी पुन्हा लांबणीवर? विधानसभेच्या तोंडावर निकाल येणार?
Shivsena Political CrisisSaam Tv
Published On

दिल्ली, ता. १३ मे २०२४

शिवसेना पक्ष अन् चिन्ह प्रकरणी निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय तसेच विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेच्या निकालाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार होती. मात्र सुप्रीम कोर्टातील या दोन्ही प्रकरणाची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.

दोन्ही सुनावण्या पुन्हा लांबणीवर?

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर उद्या म्हणजे 14 मे रोजी सुनावणी होणार होती. तर निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिल्या प्रकरणी ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर 17 मे रोजी सुनावणी होणार होती.

जुलै महिन्यात होणार सुनावणी?

मात्र आता या दोन्ही प्रकरणाच्या सुनावण्या पुन्हा पुढे ढकलण्यात येण्याची शक्यता असून थेट जुलै महिन्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड हे ब्राझिल दौऱ्यावर जाणार असल्याने ते कामकाजात नसतील. या दोन्ही प्रकरणाच्या सुनावण्या CJI यांच्या पिठासमोर होत्या मात्र ते सुट्टीवर असल्याने या सुनावण्या होणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

Shivsena Crisis News: तारीख पे तारीख! शिवसेना पक्ष आणि आमदार अपात्रतेची 'सुप्रीम' सुनावणी पुन्हा लांबणीवर? विधानसभेच्या तोंडावर निकाल येणार?
Dilip Walse Patil: 'आरोप प्रत्यारोप, भावनिक आवाहन लोकशाहीला शोभणारं नाही', दिलीप वळसे पाटलांचा राज्यकर्त्यांना टोला

विधानसभेच्या तोंडावर निकाल येण्याची शक्यता

दरम्यान, शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निकाल तसेच आमदार अपात्रतेचा निकाल हा राज्याच्या राजकारणाला मोठी कलाटणी देणारा आहे. परंतु मागच्या अनेक महिन्यांपासून शिवसेनेच्या सत्तासंघर्षाची सुनावणी झालेली नाही. त्यामुळ या प्रकरणाचा निकाल थेट विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लागण्याची शक्यता आहे.

Shivsena Crisis News: तारीख पे तारीख! शिवसेना पक्ष आणि आमदार अपात्रतेची 'सुप्रीम' सुनावणी पुन्हा लांबणीवर? विधानसभेच्या तोंडावर निकाल येणार?
Nashik Loksabha: हेमंत गोडसेंसाठी CM शिंदे मैदानात! मध्यरात्री मोठी खलबतं; मुख्यमंत्र्यांकडून नाराजांच्या मनधरणीचे प्रयत्न

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com