AI-Generated Car Accident saam tv
व्हायरल न्यूज

Car Accident: हे कसं शक्य आहे? हायवेवरच्या २० फूट उंच बोर्डात अडकली थार, व्हिडिओ पाहून नेटकरी चक्रावले

AI-Generated Car Accident: NH-48 वर साइन बोर्डमध्ये घुसलेल्या थारचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. हा अपघात खरा आहे की एआयने तयार केलेला, याबाबत इंटरनेटवर चर्चा रंगली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

रस्त्यावर आतापर्यंत तुम्ही अनेक अपघात पाहिले असतील. मात्र असं दृश्य तुम्ही कधीच पाहिलं नसेल. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून प्रत्येकजण, हे कसं शक्य आहे, असा प्रश्न विचारतोय. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये थार गाडी थेट साइन बोर्डमध्ये घुसलेली दिसतेय.

हा व्हिडीओ पाहून अनेकांनी विविध कमेंट्स केल्यात. मात्र यानंतर सोशल मीडियावर एक चर्चा रंगली आहे. अनेकांच्या म्हणण्यानुसार, हा व्हिडीओ AI ने बनवला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हिडीओ

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक व्हिडिओ झपाट्याने व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये एक थार गाडी हायवेवर असलेल्या साइन बोर्डमध्ये आदळलेली दिसतेय. बोर्डवर दिल्ली, गुरुग्राम आणि जयपूरला कसं जायचं या दिशांचा उल्लेख दिसतो. पहिल्यांदा पाहिल्यानंतर हे तुम्हाला एखाद्या सिनेमातील सीनसारखं दिसतंय. ज्यामुळे लोकांना आश्चर्ययाचा धक्का बसलाय.

हा व्हिडिओ @MeenaRamesh91 नावाच्या अकाऊंटवरून सोशल मीडियावर पोस्ट केला होता. ज्यामध्ये एक मजेशीरल कॅप्शनही लिहिलं होतं. क‌ॅप्शनमध्ये म्हटलंय की, थार कदाचित जयपूरला जात होती. मात्र आता ती थेट जयपूरला पोहोचलीये.

आतापर्यंत या कथित अपघाताबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. कोणत्याही मीडिया रिपोर्टमध्ये याचा उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे असा अंदाज व्यक्त केला जातो की, हा व्हिडिओ मनोरंजन किंवा व्हायरल म्हणून एआयने तयार करण्यात आला असावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नीलम गोर्हे कल्याण जीआरपी पोलीस ठाण्यात दाखल

Gold Investment: आता NSE वर शेअर्सप्रमाणे खरेदी करू शकाल सोने; काय आहे EGR? जाणून घ्या फायदे-तोटे

एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसणार, शिवसेनेतील बडा नेता नाराज? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Accident: पालघरमध्ये वऱ्हाडाच्या ट्रकला कंटेनरची धडक, १२ जणांचा मृत्यू; मुंबई- अहमदाबाद महामार्गावर रक्ताचा सडा

Makeup Box Full Kit: परफेक्ट मेकअप लूकसाठी बॉक्समध्ये असायला पाहिजेत 'हे' ब्यूटी प्रॉडक्ट

SCROLL FOR NEXT