Hepatitis B and C : बापरे ! ३.५ कोटी भारतीयांवर आरोग्याचं संकट ; WHO चा धक्कादायक अहवाल

Hepatitis B and C : यकृताशी संबंधित हा आजार भारतात झपाट्याने पसरत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अहवालानुसार भारतात ३.५ कोटी रुग्ण आहेत. हे रोग हेपेटायटीस बी आणि हेपेटायटीस सी आहेत. रुग्णांच्या संख्येत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
 Hepatitis B and C
Hepatitis B and Cyandex

Hepatitis B and C :

तुम्हाला सांधे आणि स्नायूंमध्ये दुखण्याचा त्रास होत असेल आणि वारंवार ताप येत असेल तर सावध व्हा. कदाचित हे दुखणं हिपॅटायटीस बी किंवा हिपॅटायटीस सीचा आजार असू शकतो. भारतात हिपॅटायटीस बी आणि हिपॅटायटीस सी च्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार २०२२ मध्ये भारतात हिपॅटायटीस बी आणि हेपेटायटीस सी रुग्णांची संख्या ३.५ कोटी होती.

यामध्ये हिपॅटायटीस बी चे २.९८ कोटी तर हिपॅटायटीस सी चे ५५ लाख रुग्ण आढळलेत. यावेळी या आजाराने ग्रस्त रुग्णांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे. या आजाराचे सर्वाधिक रुग्ण चीनमध्ये आहेत, भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

WHOच्या अहवालानुसार, हेपेटायटीस बी आणि सीमुळे जगभरात दरवर्षी सुमारे 13 लाख लोकांचा मृत्यू होतो. हा रोग टीबी नंतर सर्वाधिक मृत्यू याच आजाराने होता. जगभरातील हिपॅटायटीस बी आणि सी मुळे दररोज सुमारे ३५०० लोकांची जीव गमावावा लागत आहे. हिपॅटायटीस हा यकृताचा आजार आहे जो विषाणूजन्य संसर्गामुळे होतो. यामध्ये यकृताला सूज येते. हिपॅटायटीस ए, हिपॅटायटीस बी, हिपॅटायटीस सी, हिपॅटायटीस डी आणि हिपॅटायटीस ई असे ५ प्रकारचे हिपॅटायटीसचे विषाणू आहेत.

अशी लक्षणे ओळखा

 • सांधे आणि स्नायूंमध्ये वेदना होणे.

 • कावीळ किंवा पिवळे डोळे होणे.

 • मूत्राचा गडद पिवळा रंग होतो.

 • सतत ताप आणि शरीराचे वजन कमी होत असते.

 • दिवसभर थकवा जाणवतो.

 • भूक न लागणे आणि पोटदुखी.

 • उलट्या होणे किंवा उलट्या झाल्यासारखे वाटणे.

हा आजार होण्याची मुख्य कारणे

 • व्हायरल इन्फेक्शन असणे.

 • खराब रक्त संक्रमण होणे

 • दुसऱ्या व्यक्तीवर वापरलेली सिरिंज वापरणे.

 • संक्रमित अन्न किंवा पाणी वापरणे.

 • एखाद्याच्या उष्ट अन्न पदार्थ खाणे

 • असुरक्षित संभोग करणे.

 • जास्त प्रमाणात दारू पिणे इत्यादी कारणामुळे हा आजार होत असतो.

अशा प्रकारे करा स्वतःचे रक्षण

 • जेव्हा तुम्हाला इंजेक्शन मिळेल तेव्हा नेहमी नवीन सिरिंज वापरा.

 • दुसऱ्याने वापरलेले ब्लेड किंवा वस्तरा वापरू नका.

 • आजारी व्यक्तीसोबत अन्न खाऊ नका. त्याचे उष्ट अन्नही खाऊ नका.

टीप : वरील सर्व साम टीव्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून साम टीव्ही कोणताही दावा करत नाही.

 Hepatitis B and C
Power Nap Time : तुम्हालाही दुपारी झोपण्याची सवय आहे? जाणून घ्या आरोग्यासाठी किती फायदेशीर?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com