Viral Video Claims saam tv
व्हायरल न्यूज

Viral Video: देशातील एक असं रेल्वे स्टेशन जिथे वर्षातून फक्त दोनदा येते ट्रेन; काय आहे कारण, वाचा

पंजाबमधील हुसैनीवाला रेल्वे स्टेशनवर वर्षातून फक्त दोनदाच ट्रेन येते, असा दावा असलेला व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या अनोख्या रेल्वे स्टेशनबद्दल जाणून घ्या रंजक माहिती.

Surabhi Jayashree Jagdish

सोशल मीडियावर सध्या एका अनोख्या रेल्वे स्टेशनचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडिओमध्ये पंजाबमधील हुसैनीवाला रेल्वे स्टेशनवर वर्षातून फक्त दोनदाच ट्रेन येते, असा दावा करण्यात आला आहे. या दाव्यामुळे अनेकांनाही याबाबत उत्सुकता दाटून आली आहे.

अनोख्या रेल्वे स्टेशनचा व्हिडीओ व्हायरल

इंस्टाग्रामवरील @_northern_vlogger या हँडलवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती हुसैनीवाला रेल्वे स्टेशनची माहिती देताना दिसतो. या व्हिडीओमध्ये तो सांगतो की, 'मी ज्या ठिकाणी उभा आहे, त्या स्टेशनवर वर्षातून फक्त दोनदाच ट्रेन येते' हा दावा ऐकून अनेकजण आश्चर्यचकित झालेत.

पंजाबमधील फिरोजपूर आणि हुसैनीवाला सीमेच्या दरम्यान असलेले हे स्टेशन रेल्वे मार्गाचा शेवटचा टप्पा आहे. या ठिकाणाहून पुढे कोणतीही रेल्वे सेवा नाही. व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेली ट्रेन ही विशेष सेवा असल्याचंही सांगण्यात आलंय.

या विशेष ट्रेनचे वेळापत्रकही तितकेच वैशिष्ट्यपूर्ण आहे. ही ट्रेन वर्षातून फक्त दोन वेळा २३ मार्च आणि १३ एप्रिल या दिवशी चालवली जाते. २३ मार्च हा दिवस स्वातंत्र्यवीर भगतसिंह यांच्या शहादत दिनानिमित्त अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी देशभरातून अनेक लोक हुसैनीवालामध्ये श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी येतात. तर १३ एप्रिलला बैसाखीच्या सणानिमित्तही मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. या दोन खास दिवसांवरच रेल्वे सेवा सुरू केली जाते.

व्हिडिओमध्ये पुढे सांगण्यात आलंय की, 'ही ट्रेन ज्या मार्गाने आली, त्याच मार्गाने परत जाते. कारण या स्टेशननंतर रेल्वे ट्रॅकच संपतो.' यामुळे हे स्टेशन खरोखरच रेल्वे मार्गाचा अंतिम टप्पा असू शकतो.

या व्हिडिओला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय. अनेक यूजर्सनी आश्चर्य व्यक्त करत कमेंट्स केल्या आहेत. एका यूजरने लिहिलंय, 'या स्टेशनचं नाव बदलून भगतसिंह यांच्या नावावर ठेवले पाहिजे.' तर दुसऱ्याने कमेंट केलीये की, 'मी फिरोजपूरचा आहे, हे पाहून अभिमान वाटतो.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: गुहागरच्या बुधल बीचवर चिपळूणच्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT