Viral Video: वय १०३ वर्ष पण अंगी जिद्द आणि चिकाटी; आजींचा चहाच्या टपरीवरील संघर्ष पाहून युजर्स भावूक

Inspirational story: वडोदऱ्यातील 103 वर्षांच्या कशीबा या आजींचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या वयातही त्या चहाची टपरी चालवत असून त्यांच्या मेहनतीने आणि जिद्दीने सर्वांना प्रेरणा दिली आहे.
Inspirational story
Inspirational storysaam tv
Published On

वडोदऱ्याच्या १०३ वर्षांच्या कशीबा नावाच्या वृद्ध महिलेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. रस्त्याच्या कडेला छोट्या चहाच्या टपरीवर काम करणाऱ्या या आजींची जिद्द पाहून अनेकजण त्याबाबत चर्चा करू लागलेत. इंस्टाग्रामवर शेअर झालेल्या या व्हिडिओने हजारो लोकांचं लक्ष वेधून घेतलंय.

हा व्हिडिओ साक्षी सिंह या मुलीने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये कशीबा यांची ओळख करून देताना ती म्हणते, 'वयोमानाने त्यांच्या वाकलेल्या कंबरमध्ये कमजोरी नाही, तर एका शतकाचं धैर्य दडलेलं आहे.'

Inspirational story
Viral wedding video: नवऱ्याचा हटके स्टाइल पाहून लोक थक्क, लाईट्सच्या ड्रेसमुळे व्हिडिओ झाला व्हायरल

काशिबांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

व्हिडिओमध्ये कशीबा स्वतः चहा बनवताना तसंच आपल्या दैनंदिन कामांमध्ये व्यस्त असल्याचं दिसतंय. वयाच्या या टप्प्यावरही त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहून काम करतायत हे दृश्य अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतंय. व्हिडीओमध्ये पुढे म्हटलंय की, 'जिथे या वयात लोक आधार शोधतात, तिथे त्या स्वतःच स्वतःचा आधार आहेत. त्यांच्या थरथरणाऱ्या हातांना थकवा येतो, पण ते कधी थांबत नाहीत.'

कशीबा यांची टपरी वडोदऱ्यातील एमएस युनिव्हर्सिटीच्या फाइन आर्ट्स फॅकल्टीजवळ आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये नमूद करण्यात आलंय की, जग जिथे आरामाच्या करण्याच्या मागे धावतंय तिथे त्या खऱ्या ताकदीची आठवण करून देतात. १०३ व्या वर्षीही त्या काम करणं आणि पुढे जाणं हा मार्ग त्यांनी निवडला आहे.

Inspirational story
Viral Video: रस्त्याच्या कडेला रोमान्स, Kiss करताना तोल गेला आणि...; पुढे जे घडलं ते पाहून हसू आवरणार नाही!

सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया

प्रेक्षकांच्या या व्हिडीओवर विविध कमेंट्स दिल्या आहेत. एका युजरने लिहिलंय की, 'आम्ही त्यांना अनेक वर्षांपासून पाहतोय. त्यांचा चहा आणि मेथी गोटा आजही आमचा फेवरेट आहे'. तर दुसऱ्या युजरने म्हटलंय की, मला यांच्याकडे पाहून मला माझ्या आजीची आठवण येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com