Bird Viral Video Saam tv
व्हायरल न्यूज

Bird Viral Video: 'बाल है या चिडिया का घोसला'तरुणाच्या कुरळ्या केसात जाऊन बसला पक्षी; VIDEO VIRAL

Bird Seat On Man Curly Hair Viral Video: सोशल मीडियावर रोज मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर एका पक्षाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात एका तरुणाच्या कुरळ्या केसात पक्षी बसल्याचे दिसत आहे. पक्षाने ते आपलेच घरटं असल्याचे मानले असल्याचे बोलले जात आहे.

Siddhi Hande

सोशल मीडियावर रोज अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. यात अनेकदा जुगाडचे, लग्नातील व्हिडिओ असतात. परंतु जर या व्हिडिओच्यात नादात तुमच्या केसात कोणत्या पक्षाने घर केले तर? तुम्हालाही विश्वास बसत नाहीये ना? पण एका पक्षाने आपले घरटे शोधण्यासाठी चक्क एका माणसाच्या केसात आसरा घेतला आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

प्रत्येकालाच आपले केस खूप आवडतात. काहींना कुरळे केस आवडतात तर काहींना एकदम सरळ केस आवडतात. केसांमुळे आपल्याला शोभा येते असं अनेकांचे म्हणणे असते. परंतु याच केसांमुळे जर कोणाची फजिती झाली तर. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत पक्षी एका माणसाच्या कुरळ्या केसांत जाऊन आपले घरटे शोधताना दिसत आहे. हा मजेशीर व्हिडिओ पाहून नेटकरी चकित झाले आहेत.

व्हायरल व्हिडिओत कुरळे केस असलेला एक माणूस दिसत आहे. त्याच्या केसात एक पक्षी बसलेला दिसत आहे. पक्षी आपले घरटे असल्याचे समजून या व्यक्तीच्या केसात जाऊन बसल्याचे सांगण्यात येत आहे. या तरुणाच्या मित्रांनी हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे.

या व्हिडिओवर 'केस आहे का पक्ष्यांचे घरटे?'असं हिंदीतून लिहलं आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 'कुरळे केस असल्याचे तोटे खूपच आहे', 'कुरळे केस पाहून पक्षीदेखील गोंधळले', अशा कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे शहरातील आणखी एक पूल पाण्याखाली

Pune Crime News : पुणे हादरलं !सासरवाडीत जाऊन पतीने केली पत्नीची हत्या; धक्कादायक कारण समोर

Shengdana Chikki: श्रावणात खास बनवा शेंगदाणा चिक्की, महिनाभर खाता येईल

Raigad To Arnala Fort: रायगड किल्ल्यावरून अर्नाळा किल्ल्यापर्यंत प्रवास कसा कराल? जाणून घ्या प्रमुख टप्पे आणि टिप्स

Nag Panchami 2025: नाग पंचमीला घरी पूजा कशी करावी?

SCROLL FOR NEXT