शिवा बाबाचा आणखी एक प्रताप, भूत उतरवण्यासाठी महिलेला बेदम मारहाण; पाहा व्हिडिओ
Shiva Baba Viral VideoSaam Tv

Baba Viral Video: शिवा बाबाचा आणखी एक प्रताप, भूत उतरवण्यासाठी महिलेला केली बेदम मारहाण; पाहा व्हिडिओ

Baba Beaten Woman: बुलढाणा येथील एका बाबाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत हा भोंदू बाबा एका महिलेला बेदम मारहाण करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही संताप आल्याशिवाय राहणार नाही.
Published on

दारू सोडवण्यासाठी आलेल्या व्यक्तीला घाटनांद्रा येथील शिवाजी बर्डे उर्फ शिवा महाराजाकडून बेदम मारहाण करण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या प्रकरणी मार खाणारा व्यक्ती राजेश राठोड (जि. जालना) याने रायपूर पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिल्याने शिवाजी बरडे याच्या विरुद्ध काल मारहाण केल्याचा विविध कलमान्वये गुन्हा दाखल झालाय.

महाराजाचे हे प्रकरण गाजत असतांनाच आज पुन्हा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये शिवा महाराज एका महिलेला मारहाण करताना दिसत आहे. हा भोंदू बाबा महिलेच्या अंगातील भूतबाधा उतरवण्याची तिला मारहाण करत असल्याचं या व्हिडिओतील संभाषणावरून समोर आलं आहे. त्यामुळे या बाबांकडून जादूटोणा विरोधी कायद्याचा भंग झालाय.

शिवा बाबाचा आणखी एक प्रताप, भूत उतरवण्यासाठी महिलेला बेदम मारहाण; पाहा व्हिडिओ
Viral Video : दारू सोडवायला गेला अन् बाबाने चांगलाच कुटला; व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

हा बाबा ज्या महिलेला मारहाण करत आहे, ही महिला नेमकी कोण आहे, कुठली रहिवासी आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.मात्र भूत उतरविण्याचा प्रकार महाराज करत असल्याचे व्हिडिओत दिसते आहे. आता या बाबावर पोलिसांकडून काय कारवाई केली जाते? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

शिवा बाबाचा आणखी एक प्रताप, भूत उतरवण्यासाठी महिलेला बेदम मारहाण; पाहा व्हिडिओ
Uttarakhand Video: उत्तराखंडमध्ये पावसाचा हाहाकार! सुखी नदीला पूर, शेकडो वाहनं पाण्यात; पाहा व्हिडिओ

दरम्यान, या तथाकथित बाबाने एका मुलीच्या अंगातील भूत उतरवण्याच्या बाहण्याने तिला जी मारझोड केली, तिचे केस उपटले, हा महाराष्ट्र शासनाच्या जादूटोना विरोधी कायद्या अंतर्गत अनुसूची 1 नुसार गुन्हा आहे. अशा प्रकारे भूत उतरवण्याच्या बाहण्याने मारझोड करणे, तिचे केस उपटने, अघोरी उपचार करणे, हा गुन्हा असून महाराजावर तात्काळ गुन्हा नोंदविण्यात यावा आणि बाबाला अटक व्हावी, अशी मागणी अखिल भारती अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com