Bride Video Viral : वरातीत नवरीचा धडाकेबाज डान्स; व्हिडीओपाहून नेटकरी म्हणाले ब्राइड आहे की गँगस्टर

Bride Dance Video Viral : नवरीने नवरदेवाला इंप्रेस करण्यासाठी बॉलिवूडच्या एका गाण्यावर डान्स केला आहे.'शूटर का बढिया तेरा यार माफिया ' या गाण्यावर नवरी नाचत आहे.
Bride Dance Video Viral
Bride Video ViralSaam TV
Published On

सोशल मीडियावर सध्या लग्न सराईतील अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. लग्नात डान्स करण्याची आता जणू काही प्रथाच झाली आहे. प्रत्येक कपल आपल्या जोडीदारासोबत किंवा त्याला इंप्रेस करण्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात. त्यात काहीवेळा असं काही घडतं की ते व्हिडिओ मोठ्याप्रमाणात चर्चेत येतात. आताही सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Bride Dance Video Viral
Bride Escape From Marriage : प्रियकराशिवाय राहू शकत नाही; लग्नमंडपातून नवरी पळाली

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लग्न लावून नवरदेव आणि नवरी घरी आलेत. येथे आल्यावर लग्नाची वरात काढण्यात आली आहे. त्यावेळी नवरीने नवरदेवाला इंप्रेस करण्यासाठी बॉलिवूडच्या एका गाण्यावर डान्स केला आहे.'शूटर का बढिया तेरा यार माफिया ' या गाण्यावर नवरी नाचत आहे.

तशी ती या गाण्यावर साधी सिंपल स्टेप्समध्येच नाचत आहे. मात्र तिने निवडलेलं गाणं ऐकून सारेच थक्क झालेत. नवरिने हे गाणं निवडल्याने कमेंटमध्ये तिला अनेकजण गँगस्टर असं सुद्धा म्हणत आहेत. नवरीच्या डान्सचा हा व्हिडिओ @wedding_vibes या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. सध्या या व्हिडिओची सोशल तुफान चर्चा रंगली आहे.

नवरी एवढी खतरनाक आहे की घरी गेल्याबरोबर आपल्या सासूबरोबर पंगा घेईल. नवरी नवरदेवाला वॉर्निंग देत आहे, अशा काही मजेशीर कमेंट सुद्धा यावर आल्या आहेत. डान्स करत असलेली नवरी दिसायला सुद्धा फार सुंदर आहे. तिने लाल रंगाचा घागरा परिधान केलाय. तसेच डोक्यावर ओढणी घेऊन ती मजेत यावर डान्स करत आहे.

सोशल मीडियावर या आधी देखील नवरी आणि नवरदेव यांच्या डान्सचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच एक नवरी डान्सच्या चक्करमध्ये स्टेजवरून खाली कोसळली होती. तर एका कपलने लग्नात फायर गन आणली होती. ही फायर गन स्टेजवर नेताच तिचा स्फोट झाला होता.

Bride Dance Video Viral
Bride Dance Viral Video : नव्या नवरीचा स्टेजवरच 'खत्रुड' डान्स; स्टेप्स बघून नवरदेवाला हसू आवरेना!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com