Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: आखाड्यातला मित्र पोलिसांच्या सुरक्षा बंदोबस्तात भेटतो तेव्हा, मंत्री मुरलीधर मोहोळ भारावले, काळजाला भिडणारा VIDEO

Viral Video News: सोशल मीडियावर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात पसंती पडत आहे. नक्की काय घडलं व्हिडिओत पाहा.

Tanvi Pol

Murlidhar Mohol Video: आयुष्याच्या जडणघडणीत आपल्याला अनेकांच्या साथ लाभते. आई- वडिल, बहिण-भाऊ आणि पती-पत्नीचे या सर्वांचे नाते आपल्या सर्वांसाठी अमुल्य असतेच. मात्र यांच्या सर्वासोबत पाठीराखा असतो तो म्हणजे मित्र. मित्र अर्थात निस्वार्थ मैत्री. आजपर्यंत आपण मैत्रीबद्दलचे अनेक गोष्टी पाहिल्या, अनुभवल्या किंवा अनेकांकडून त्यासंबंधित गोष्टी ऐकल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर या मैत्रीचा एक अनोखा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो खुद्द केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केलेला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे त्यांच्या तालमीतील मित्र (friend) भेटतात आणि ते मित्र मुरलीधर मोहोळ यांच्या बंदोबस्तासाठी आलेले असतात. त्यावेळी त्यांचे मित्र त्यांना भेटतात. मग पुढे व्हिडिओत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे मित्राच्या खांद्यावर हात ठेवत, इतरांना सांगतात की हे मात्र तालमीतील मित्र आहेत. त्यांच्या सोबत काहीसा संवाद साधतात, असा हा व्हायरल व्हिडिओ (Video) आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ खुद्द केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीच त्यांच्य एक्स ''@mohol_murlidhar'' अकाउंटवर पोस्ट केलेला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच लाखोंच्या संख्या असलेल्या नेटकऱ्यांनी लाईक्स केलेले असून अजूनही व्हिडिओला व्ह्यूज मिळत आहेत.

व्हिडिओ शेअर करत मोहोळ यांनी कॅप्शनमध्ये,''संघटनात्मक दौऱ्यानिमित्त आज कोल्हापूर जिल्ह्यात गेलो असता माझ्या सुरक्षेसाठी लावलेल्या पोलिसांच्या सुरक्षा बंदोबस्तात कोल्हापूर पोलीस दलात काम करणारा माझा कोल्हापूरच्या तालमीतील मित्र श्री. शहाजी पाटील अचानक समोर आला. शहाजी दिसताच ताफा थांबवत त्याची भेट घेतली आणि संवाद साधला. इतक्या वर्षांनी अचानकपणे झालेली ही भेट सुखद धक्का देणारी ठरली. इतकंच नाही तर त्याला पाहाताक्षणी तालमीत असतानाच्या आठवणींचा पट क्षणार्धात डोळ्यासमोर उभा राहीला'' असे लिहिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरेंकडून युतीचे संकेत

विजयी मेळाव्याला या मराठी कलाकारांची हजेरी, Photo पाहा

Marathi Vijay Melava: संपूर्ण लाईट बंद... इकडून उद्धव, तिकडून राज, ठाकरे बंधूंची ग्रँड एंट्रीने वरळी डोम दणाणला|VIDEO

Raj-Uddhav Thackeray Video: सुवर्णक्षण! खणखणीत भाषनानंतर राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंना टाळी, दोघेही खळखळून हसले, पाहा video

Rice Cooking Tips: भात पातेल्यात शिजवावा की कुकरमध्ये? वाचा फायदे-तोटे

SCROLL FOR NEXT