Viral Video: बाईssss काय हा प्रकार..? नवरात्रीला मंडपातील सजावट पाहून थक्क व्हाल, चिमुकल्यांसाठी काय केलं तुम्हीच पाहा

Funny Viral Video: सध्या नवरात्री उत्सव राज्यभरात नुकताच पार पडला आणि आता त्यासंबंधित अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात सध्या बिहारमधील डेकोरेशनचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Funny Viral Video
Viral VideoSaam Tv
Published On

Unique Decoration Viral Video: जगात दरदिवशी अनेक कार्यक्रम पार पडतात. कधी कोणाचे लग्न तर कुठे घरच्या घरी साजरा केलेला वाढदिवस. सर्व कार्यक्रमांमध्ये केली जाणारी साधारण गोष्ट म्हणजे 'डेकोरेशन'. कोणत्याही कार्यक्रमाला अनेकदा चारचाद लागतात तेव्हा कार्यक्रमामध्ये अनेक आकर्षक फुलांची किंवा अनेक गोष्टीनी केली जाणारी सजावट. काही दिवसांपूर्वी गणेशोत्सव पार पडला त्यामध्ये डेकोरेशन हा मुख्य बिंदू असतो. मात्र सध्या देशभरात नवरात्री उत्सव पार पडला तेव्हाही नाक्यानाक्यावर उभारलेल्या मंडपात आपल्याला अनेक अद्भुत अशा डेकोरेशनच्या पद्धती पाहण्यास मिळाल्या. या विषयी बोलायचे झाले कारण, सध्या सोशल मीडियावर एका मंडपातील डेकोरेशनची चर्चा होत आहे, ज्या मंडपात चक्क वेफर्सच्या पाकिटांनी सजावट केलीली आहे.

व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक दूर पर्यंत मंडप दिसून येत आहे. मंडप गुलाबी रंगाच्या कापडाने सजवलेला आहे. काही वेळात मंडपाच्या दिशेने कॅमेरा जसा जवळ जातो. तस मंडपात तुम्हाला फुलांच्या माळाच्या जागी सर्वत्र वेफर्स आणि थंड पेय ही डेकोरेशनच्या जागी लावलेली दिसून येत आहेत. सध्या सोशल मीडियावर अनोख्या डेकोरेशनचा व्हिडिओ (Video) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ 'इन्स्टाग्राम' या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करण्यात आलेला असून तो इन्स्टाग्रामवरील 'gauravxmemes' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये,''बिहारी कोणासाठी नाही'' असे लिहिण्यात आलेले आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ बिहारमधील असल्याचे समजते.

बिहारमधील व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांच्या पसंतीस आलेला आहे. एवढेच नाही तर व्हिडिओ पाहून अनेक प्रतिक्रियाही आलेल्या आहेत, त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''बिहारींचा आदर'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''लोकं काही करतील सांगता येत नाही'' अशाच गमतीदार प्रतिक्रिया व्हिडिओ पाहून आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Funny Viral Video
Viral Video: हद्दच झाली! भररस्त्यात तरुणांची स्टंटबाजी; धावत्या बससोबत केले स्केटिंग; VIDEO पाहून उडेल अंगाचा थरकाप

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com