Atul Parchure Viral Video : खरा मित्र कोणाला म्हणावं? मैत्रीवरील अतुल परचुरेंचा 'हा' व्हिडिओ पाहिलात का?

Atul Parchure death : अतुल परचुरे यांच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. परचुरे यांच्या निधनानंतर त्यांचा मैत्रीवर भाष्य करणारा व्हिडिओ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
खरा मित्र कोणाला म्हणावं? मैत्रीवरील अतुल परचुरेंचा हा व्हिडिओ पाहिलात का?
Atul Parchure Viral Video Saam tv
Published On

मुंबई : मराठी रंगभूमी गाजवणारा हरहुन्नरी कलाकार, ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झालं आहे. अतुल परचुरे यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ५७ व्या वर्षी अतुल परचुरे यांनी अचानक एक्झिट घेतल्याने मराठी सिनेविश्वावर शोककळला पसरली आहे. अतुल परचुरे यांच्या निधनानंतर त्यांचा मैत्रीवर भाष्य करणाऱ्या व्हिडिओची चाहत्यांना आठवण झाली आहे.

अतुल परचुरे यांनी मराठीसहित हिंदी चित्रपटातही काम केलं आहे. तसेच त्यांनी मालिका आणि नाटकांमध्येही विशेष भूमिका साकारल्या होत्या. कॅन्सरवर मात केल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा जोमाने सिनेसृष्टीत काम करण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या सिनेमा आणि नाटकांमधील भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं होतं. अतुल परचुरे यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीत न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. सिनेमातून नेहमी प्रेक्षकांना खळखळून हसवणारे अतुल परचुरे चाहत्यांना रडवून गेले आहेत.

अतुल परचुरे विविध विषयांवर परखड मत मांडायचे. एका कार्यक्रमात अतुल परचुरे यांनी मैत्रीवर विचार करायला भाग लावणारं भाष्य केलं होतं. त्यानंतर मैत्रीवर भाष्य केलेल्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. अतुल परचुरे म्हणाले होते की, 'आपण समोरच्या व्यक्तीसाठी काय आहोत, समोरचा आपल्याला काय समजतो, हे कळणं आपल्याला फार महत्वाचं असतं. त्यात गल्लत झाली तर फार गडबड होऊ शकते'.

खरा मित्र कोणाला म्हणावं? मैत्रीवरील अतुल परचुरेंचा हा व्हिडिओ पाहिलात का?
Ratan Tata : श्वान आजारी पडलं, टाटांनी थेट राजघराण्याचं आमंत्रण नाकारलं; आज लाडका 'गोवा' पोहोचला अंत्यदर्शनासाठी

'तुम्ही एखाद्याला भयंकर जवळचा मित्र समजता आणि तो तुम्हाला टाइमपास समजतो. त्याने फोन केल्यावर तुम्ही लगेच हजर होता. त्यानंतर तुन्हा छान बोलता. एकमेकांना हसवतात. जेव्हा त्याला एखाद्याला भेटण्याची संधी येते, तेव्हा त्याला कोणाला भेटायचं ठरवायचं असतं. तेव्हा तो वेगवेगळ्या लोकांना भेटताना दिसतो. तेव्हा तुम्हाला वेळ नाही, असं सांगतो. तेव्हा आपल्याला वाटतं की, आपलं कुठंतरी चुकलंय. समोरच्यासाठी आपण कोण आहोत, हे आपल्याला कळलं पाहिजे,असे परचुरे पुढे म्हणतात.

अतुल परचुरे यांनी मैत्रीवर भाष्य केल्यानंतर अनेकांना त्यांचा विचार पटला होता. परचुरे यांचा मैत्रीवर भाष्य करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याकाळात परचुरे यांचा तो व्हिडिओ अनेकांंनी व्हाट्सअॅप स्टेटस ठेवला होता. दरम्यान, परचुरेंच्या निधनानंतर पुन्हा एकदा चाहत्यांना त्यांच्या जुन्या व्हिडिओची आठवण झाली आहे.

खरा मित्र कोणाला म्हणावं? मैत्रीवरील अतुल परचुरेंचा हा व्हिडिओ पाहिलात का?
Atul Parchure Death : प्रसिद्ध अभिनेते अतुल परचुरे काळाच्या पडद्याआड, वयाच्या ५७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मालिकांमधील भूमिका प्रचंड गाजल्या

दरम्यान, अतुल परचुरे यांनी हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. गेल्या काही वर्षांत अळी मिळी गुपचिळी, होणार सून मी ह्या घरची, जागो मोहन प्यारे, भागो मोहन प्यारे या मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. परचुरे यांनी कापूसकोंड्याची गोष्ट, तरुण तुर्क म्हातारे अर्क, गेला माधव कुणीकडे, नातीगोती, तुझं आहे तुजपाशी, व्यक्ती आणि वल्ली, टिळक आणि आगरकर अशा विविध नाटकांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. त्यांच्या अभिनयाचं प्रेक्षक भरभरुन कौतुक करायचे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com