ST Driver Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

ST Driver Viral Video: दे दणा दण! लाथा, बुक्क्यांनी मारहाण;एसटी आगारातच चालक आणि अधिकार्‍यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

ST Driver fight Viral Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओत एसटी चालक आणि अधिकाऱ्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी होताना दिसत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दररोज सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये अनेक व्हिडिओ जुगाडचे, हाणामारीचे असतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यात बस चालक आणि एसटी अधिकाऱ्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे.

साकोली आगारात बस चालक आणि अधिकाऱ्यांमध्ये मारामारी झाली आहे. बस फेरीवरील चालकाच्या कर्तव्याची कामगिरी क्रमानुसार लावण्याच्या मुद्द्यावरुन हा वाद झाला आहे. हाच वाद पुढे टोकाला गेला अन् त्यांच्यात मारामारी झाली.भंडाऱ्यातील साकोली एसटी आगारात हा प्रकार घडला आहे. (ST Driver fight Video)

चालकाच्या आणि अधिकाऱ्याच्या मारामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओत एसटी आगारात अनेक कर्मचारी दिसत आहे. तिथे मध्ये चालक आणि एसटी अधिकारी एकमेकांच्या छातीवर बसून मारामारी करताना दिसत आहे. दोघेही एकमेकांना जबरदस्त मारहाण करताना दिसत आहे. त्या दोघांनीही इतर कर्मचारी थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. त्यानंतर दोघांनी समजावून बाजूबाजूला घेऊन जाताना दिसत आहे.

साकोली एसटी आगारातील हा व्हिडिओ दोन दिवसांपूर्वीचा आहे.पंकज काटनकर असं चालकाचे नाव आहे. तसेच प्रदीप करंजेकर असं एसटी अधिकाऱ्यांचं नाव आहे. त्या दोघांमध्ये सुरुवातीला बाचाबाची झाली त्यानंतर त्यांचे भांडण वाढले आणि त्यांच्यात जोरदार मारामारी झाली. हा संपूर्ण प्रकार साकोली बस स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळचा आहे. (ST Driver And Officer Fight Video)

सध्या सोशल मीडियावर अजून एका एसटी चालकाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात एसटीचालक दारुच्या नशेत बस चालवताना दिसत आहे. बदलापुरातील हा धक्कादायक प्रकार आहे. दारुच्या नशेत हा बसचालक अतिवेगाने एसटी चालवताना दिसत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT