सोशल मीडियावर आपल्याला कायमच लाल परीचे व्हिडिओ पाहण्यास मिळतात. लाल परी अर्थात ''एसटी महामंडळच्या बससे''. कोकण वासीयांसाठी लाल परीचा प्रवास अतिशय खास असतो. कारण लाल परी या महाराष्ट्रातील प्रत्येक गावा गावात लोकांना घेऊन जातात. त्यातही सुखकर प्रवास या लाल परीमधून हजोरा प्रवासी करत असतात. मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ याच लाल परीची झालेले दुरावस्था दिसत आहे. नक्की काय आहे या व्हायरल व्हिडिओ लाल परीबद्दल पाहूयात.
व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला बसमधून असंख्य प्रवासी प्रवास करताना दिसत आहे. बसमधील अनेक प्रवाशांमधून एक प्रवाशाने व्हिडिओ हा बनवलेला आहे. या व्हिडिओत तुम्हाला बसच्या ड्राईव्हच्या पाठीमागील बाजू अर्थात बसमधील आतील बाजू दिसत आहे. जर या व्हायरल व्हिडिओत तुम्ही व्यवस्थित पाहिले तर दिसेल की बसचा कोपरा तुटलेला आहे. जो काही पत्रा आहे ज्याची पूर्ण दुरावस्था झालेली आहे. अक्षरक्ष: गाडी तुटलेली असताना ही त्याच बसमधून प्रवाशांचा प्रवास होत आहे. सध्या या धक्कादायक(Shocking) घटनेचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे.
लाल परीचा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ''yeva.konkan.aaploch.aasa'' या अकाउंटवर दोन दिवसापूर्वी पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये,''ही पहा, आपल्या लाल परीची अवस्था, अक्षरशः गाडी तुटलेली आहे आणि अलिबागवरुन मूरुडला जाणारी मूरूड डेपोची बस'' असे लिहिण्यात आलेले आहे. या कॅप्शनवरुन बस नक्की कुठल्या शहरातील आहे हे समजले आहे.
व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर अनेक लाईक्स आणि व्ह्यूज व्हिडिओला मिळाले आहे तर अनेक प्रतिक्रियाही आलेल्या आहेत त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''मुरुड डेपोला अशाच भंगार बस आहेत सगळ्या'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले,''हिला लाल परी म्हणणे... म्हणजे गाढवाला.... हरीण म्हणणे असं होईल''आपण कोकणवाशी काहीच बोलत नाही ना त्यांचे हे फायदे आहेत..''अशा अनेक यूजर्सच्या संतापजनक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.