Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: अर्रर्र...! रेल्वेरुळावरचं उभं राहून तरुणीचा भलताच स्टंट; रील VIDEO पाहून नेटकऱ्यांचा संताप अनावर

Stunt Video: सोशल मीडियावर एका तरुणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात तरुणीने एक धक्कादायक स्टंट केलेला आहे.

Tanvi Pol

Young Girls Stunt Video: गेल्या काही वर्षात मनोरंजनाचे माध्यम हे रिल्स व्हिडिओ बनले आहेत. लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्वजण आवडीने रिल्स पाहत असतो. मात्र अनेकदा आवडत्या रिल्सचे अनुकरण ही केले जाते. परंतू या रील बनवण्याच्या नादात आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी धोकादायक ठिकाणी जाऊन स्टंट करत आहे. बऱ्याच वेळा रिल्स बनवताना अनेकांना जीव गमवावा लागला आहे. मात्र असे असूनही धोकादायक ठिकाणी स्टंट करणं थांबल नाही, याचा प्रत्यय तुम्हाला सध्या व्हायरल होत असलेल्या तरुणीचा व्हिडिओ पाहून येईल.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक तरुणी रेल्वे रुळाच्या मधोमध उभी असलेली दिसत आहे. तरुणी ज्या परिसरात आहे तिथे तुम्ही पाहिले तर बाजूला एक रेल्वे स्टेशन असून स्टेशनचा प्लॅटफॉर्म आहे. मात्र व्हिडिओत दिसणारी तरुणी आपल्या एका व्यक्तीसह रिल्स बनवत आहे, ज्यात ती रेल्वे रुळाच्या मध्ये फक्त उभी आहे आणि ''काटा लगा'' हे हिंदी गाणं म्हणत आहे. त्यानंतर सोशल मीडियावर तरुणीचा व्हिडिओ(Video) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

तरुणीचा रिल्स व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ''@khushivideos1m'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला असून कॅप्शनमध्ये,''काटा लगा'' असे गाण्याचे बोल लिहिले आहे. व्हिडिओ १७ ऑक्टोंबर रोजी पोस्ट झाल्यानंतर हजारो नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्स केलेल्या आहेत.

एका यूजरने प्रतिक्रिया केलेली आहे की,''चूक तर आमची झाली तुम्हाला फॉलो करुन'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''हे देवा आम्ही काय पाहत आहोत हे'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''हे शाळेचे मैदान नाही तर रेल्वेरुळ आहेत दिदी''अशा अनेक गमतीदार प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Onion Price : कांद्याला मिळतोय ४५ रुपये प्रति किलो दर; बीडच्या कडा कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक

Government Job: सरकारी नोकरीची संधी; ESIC मध्ये भरती; पगार १,६३,००० रुपये; अर्ज कसा करावा?

Vastu Tips: दिवाळीच्या दिवसात घरात सुख समृद्धी येण्यासाठी 'या' वास्तु टिप्स फॅालो करा

Bigg Boss 18 : कन्फेशन रूममध्ये मोठा खुलासा! बिग बॉसने ईशाला दाखवला रजतचा खरा चेहरा

IND A vs AUS A: ऑस्ट्रेलियात टीम इंडियाचा 'फुसका बार'; ऋतुराज 'गोल्डन डक', अख्खा संघ 107 धावांवर तंबूत

SCROLL FOR NEXT