Stunt Viral Video: रिलचा नाद लय बेक्कार! धावत्या रेल्वेसमोर व्हिडीओ काढायला गेले अन्.... पुढे जे झाले ते पाहून धक्काच बसेल

Stunt Viral Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात रिल्स शूट करण्यासाठी काही मुले रेल्वे ट्रॅकवर गेली आहेत. त्यातील एका मुलाच्या डोक्याला ट्रेनचा जोरात धक्का लागतो अन् तो खाली पडतो.
Stunt Viral Video
Stunt Viral VideoSaam Tv
Published On

सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी अनेक लोक व्लॉग, रिल्स बनवतात. परंतु हे रिल्स बनवण्याच्या नादात कधीकधी त्यांचा जीव धोक्यात जाऊ शकतो. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात युट्यूबसाठी व्लॉग शूट करताना मित्रांचा जीव धोक्यात असल्याचे दिसत आहे. (Viral Video)

Stunt Viral Video
Viral Video: नादच खुळा राव...! आजी अन् आजोबांनी धरला हलगीवर ताल; कोल्हापूरचा VIDEO पाहिला का?

सोशल मीडियावर सध्या बांग्लादेशचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात ४ मित्र युट्यूबचा व्लॉग शूट करताना दिसत आहे. रेल्वेच्या ट्रॅकवर उभं राहून ते व्लॉग शूट करताना दिसत आहे. एका बाजूने रेल्वे येत असतानाचा व्हिडिओ त्यांना शूट करायचा असतो. तेवढ्यात मागून भरधाव वेगाने रेल्वे येते आणि त्या मुलांना रेल्वेची धडक बसते. यात या मुलांना गंभीर दुखापत झालेली दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एक मुलगा व्लॉग शूट करताना दिसत आहे. त्याच्यासोबत त्याचे मित्रदेखील आहेत. त्यांना पटरीवरुन जाणाऱ्या ट्रेनला आपल्या व्हिडिओमध्ये दाखवायचं असतं. त्यामुळे ते लोक रेल्वे ट्रॅकच्या एकदम जवळ उभे असलेले दिसत आहे. त्यातील एक मुलगा ट्रॅकच्या समोर डोकं घालून व्हिडिओमध्ये यायचा प्रयत्न करताना दिसत आहे. एवढ्यात मागून भरधाव वेगात एक ट्रेन येते. या ट्रेनचा धक्का त्या मुलाला लागतो आणि तो खाली पडतो. या मुलाच्या अंगावरुन ट्रेन गेली किंवा या मुलाचा मृत्यू झाला आहे की नाही याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. परंतु इतर तीन मुलांनाही दुखापत झालेली दिसत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर रील बनवण्याच्या नादात कोणतेही असे कृत्य करु नका जेणेकरुन तुमच्या जीवाला धोका निर्माण होईल. (Train Viral Video)

Stunt Viral Video
Viral Video: कुठे हरवली माणुसकी? अल्पवयीन मुलीने उडी घेतली, तडफडत जीव सोडला, पण तो फोनवर बोलण्यात व्यस्त!

GharKeKalesh या ट्विटर अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. रिल्स बनवण्याच्या नादात जीव गमावून बसला. रिल्स बनवताना जिवाशी खेळ करु नका, अशा कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहेत.

Stunt Viral Video
Noida Viral Video : 40 लाखांच्या BMW मधून आली आणि फुलांची कुंडी घेऊन पळाली; श्रीमंत महिलेचा अतरंगी चोरीचा व्हिडिओ व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com