ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लांबचा प्रवास करण्यासाठी लोक ट्रेनने प्रवास करणे पसंत करतात. त्याने वेळ आणि पैसा दोन्हींची बचत होते.
ठिकाणाच्या लांबी नुसार तिकीटाची किंमत आपण देतो. मात्र भारतातील काही ट्रेन इतक्या महाग आहेत की त्यांचे प्रत्येकी भाडे हजारात नाही तर लाखांमध्ये आहे. त्याचबरोबर त्यांच्या सुविधांबद्दल जाणून तुम्ही थक्क व्हाल.
महाराजा एक्सप्रेस ही भारतातील सर्वात महागडी ट्रेन असल्याचे म्हटले जाते. ही ट्रेन 7 दिवस चार वेगवेगळ्या मार्गांवर प्रवास करते.
महाराजा एक्सप्रेस ही १२ डब्यांची आहे. यात फक्त ८८ लोकचं प्रवास करतात. याची किंमत अंदाजे २ लाख रुपये आहे.
'सुवर्ण रथ एक्सप्रेस' ही गोल्डन चॅरियट म्हणून प्रसिद्ध झाली. यात प्रवास करण्यासाठी एका व्यक्तीच्या तिकीटाची किंमत २ लाख ते ५ लाख रुपये आहे.
'पॅलेस ऑन व्हील्स' ही ट्रेन सर्वात महागडी आहे. या ट्रेनमध्ये राजेशाही पद्धतीचे डेकोरेशन केले आहे. यात आरामदायी प्रवास करण्यासाठी तुम्हाला तब्बल ४ लाख रुपये मोजावे लागतात.
रत्नागिरी , गोवा, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद असा प्रवास करणारी 'डेक्कन ओडिसी' आलिशान ट्रेन आहे.
'डेक्कन ओडिसी' या ट्रेनचे भाडे ९लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. तुम्ही किती दिवस ट्रेनने प्रवास करता यावर पैसे अवलंबून आहेत.
NEXT : घरच्या घरी 10 मिनिटांत बनवा कुरकुरीत रवा मसाला डोसा