ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कुरकुरीत नाश्तासाठी काही पर्याय शोधत असाल तर रवा मसाला डोसा हा उत्तम पर्याय आहे.
घरच्या घरी साउथ इंडियन स्टाईलचा रवा मसाला डोसा झटपट कसा बनवायचा पाहा.
१/२कप रवा, १/२ कप तांदळाचे पीठ, १/४ कप रिफाइंड मैदा, आवश्यकतेनुसार तेल इ.
२ चमचे कांदा, १ हिरवी मिरची, २ उकडलेले बटाटे, १ चमचा आले, १/२ चमचा जिरे, मीठ, कढीपत्त्याची पाने, कोथिंबीर. २ कप पाणी, १ चमचा दही आणि स्वयंपाकासाठी तेल.
एका भांड्यात रवा, तांदळाचे पीठ आणि मिठ एकत्र करुन घ्या. त्यातच जिरे आणि दही घाला. सोबत पाणी घालून अर्धातास ते झाकून ठेवा.
आता कढईत तेल गरम करून त्यात कढीपत्ता, जिरे, कांदा, आले आणि हिरवी मिरची टाकून फोडणी द्या.
पुढे मॅश केलेले बटाटे, मीठ आणि मिरपूड घाला. चांगले मिसळा आणि ५ ते ७ मिनिटे शिजवा. शेवटी कोथिंबीर टाका.
डोसा तव्यावर गरम करून घ्या. त्यावर बटाट्याच्या भाजी व्यवस्थित पसरवून घ्या.
तुमचा घरगुती साउथ इंडियन स्टाईल 'रवा मसाला डोसा' तयार आहे. सांबार आणि नारळाच्या चटणीचा आस्वाद घ्या.