जगभरात ७ सप्टेंबरला गणरायाचे आगमन होत आहे. तर १० सप्टेंबरला गौरी आवाहन आहे. गौरी गणपतीचा सण म्हणजे आनंद, उत्साह आणि मोदक लाडू खाणे. सध्या सोशल मीडियाचं युग सुरू असं म्हणायला हरकत नाही. कारण प्रत्येक व्यक्ती सोशल मीडियावर विविध शुभेच्छा देत आनंद साजरा करतात. तसेच गाणी आणि रिल्स व्हिडिओ बनवत असतात. त्यामुळे आज रिल्स व्हिडिओसाठी काही खास आणि भन्नाट गाण्यांची यादी आम्ही तुमच्यासाठी शोधली आहे.
देवा श्रीगणेशा
अग्निपथ या चित्रपटातील देवा श्रीगणेशा गाणं तुम्ही ऐकलंच असेल. गणपती आगमन आणि विसर्जन दोन्ही वेळी ढोल-ताशांच्या आवाजात तुम्ही हे गाणं लावू शकता. गाणं ऐकताच प्रत्येकाच्या अंगात एक वेगळाच उत्साह संचारतो.
गजानना
संजय लीला भन्साळी यांचा बाजीराव मस्तानी चित्रपट तुम्ही पाहिलाच असेल. यात सुखविंदर सिंग यांनी बाप्पाचं सुंदर गाणं गायलं आहे. गजानना, गजानना, गजानना गणराया हे गाणं सुद्धा बाप्पाची आरती झाल्यानंतर तुम्ही घरात लावू शकता. तेसच यावर सुंदर व्हिडिओ बनवू शकता.
एकदंताय वक्रतुण्डाय
प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी आजवर अनेक सुमधूर गाणी गायली आहेत. त्यातील गणपती बाप्पाचं एकदंताय वक्रतुण्डाय हे गाणं सुद्धा अगदी भन्नाट आणि कानांना मंत्रमुग्ध करणारं आहे. त्यामुळे या गणेशोत्सवात तुम्ही या गाण्यावर सुद्धा सुंदर रिल व्हिडिओ शूट करू शकता.
अशी चिक मोत्याची माळ
बॉलिवूडची अनेक सुंदर गाणी सध्या गाजत असली तरी कॅसेटच्या जमान्यात भन्नाट गाजलेलं गाणं 'अशी चिक मोत्याची माळ' तुम्ही ऐकलं असेल. या गाण्याची क्रेज आजही अनेकांच्या मनात कायम आहे. गणपती आले माझे घरा या अल्बममधील हे गाणं गाणं संगीतकार अरविंद हळदीपूर यांनी गायलंय.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.