Manasvi Choudhary
गणपती बाप्पाचा उत्सव सुरू झाला आहे घरोघरी लाडके बाप्पा विराजमान झाले आहेत.
गणपती बाप्पा घरी विराजमान झाल्यावर मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो.
गणपती बाप्पाला २१ मोदकांचा नेवैद्य दाखवण्याची पद्धत फार पूर्वीपासूनची आहे.
गणपती बाप्पाला मोदक आवडण्याचे कारण काय आहे असा प्रश्न सर्वानाच आहे.
कथेनुसार, एकेदिवशी भगवान शंकर झोपले होते. तेव्हा गणपती दरवाज्याजवळ पहारा देत होते.
जेव्हा परशुराम त्या ठिकाणी पोहोचले तेव्हा गणपतीने त्यांना थांबवले दोघांच्यात वाद सुरू झाला
याचदरम्यान दोघांच्या भांडणात गणपतीचा एक दात तुटला
दात तुटल्यामुळे गणपतीला जेवण चावताना अडथळा येत असल्याने त्यांच्यासाठी मोदक बनवले होते.
मोदक मऊ असतात त्यामुळे गणपतीने मोदक खाल्ले तेव्हापासून गणपतीला मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो.