Ganesh and Gauri Idol Sthapana Shubh Muhurt
Ganesh Chaturthi 2024Saam TV

Ganesh Chaturthi 2024 : गौरी-गणपतीच्या स्थापनेचा शुभ मुहूर्त काय? मूर्ती घरी आणल्यावर करू नका 'या' चुका

Ganesh and Gauri Idol Sthapana Shubh Muhurt : आज गणपतीसह गौरी आवाहन, गौरी पूजन आणि गौरी विसर्जन केव्हा आहे याबद्दल सविस्तर माहिती आज जाणून घेणार आहोत.
Published on

गणेशोत्सवामुळे सध्या सर्वत्र बाजारपेठ सजल्या आहेत. बाप्पाच्या आगमनासाठी सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे. अशात गणपती बाप्पासह गौराई देखील याच महिन्यात आपल्या घरी येतात. अनेक व्यक्तींच्या घरी गौरी-गणपती दोन्हींचे पूजन असते. त्यामुळे आज गणपतीसह गौरी आवाहन, गौरी पूजन आणि गौरी विसर्जन केव्हा आहे त्याची माहिती जाणून घेऊ.

Ganesh and Gauri Idol Sthapana Shubh Muhurt
Mangla Gauri Vrat 2024: पती-पत्नीच्या नात्यातील प्रेम वाढण्यासाठी मंगळा गौरीनिमित्त करा 'हे' व्रत; आयुष्यात सुख-समृद्धी नांदेल

गणेश चतुर्थी शुभ मुहूर्त

गणेश चतुर्थी शनिवारी ७ सप्टेंबर २०२४ रोजी आहे. चतुर्थी दुपारी ३.०१ वाजता सुरू होत असून रविवारी ८ सप्टेंबर सायंकाळी ५.३७ पर्यंत असणार आहे.

मूर्ती स्थापनेचा शुभ मुहूर्त

७ सप्टेंबरला मूर्ती स्थापन करण्यासाठी शुभ मुहूर्त ११.०३ ते १.३४ पर्यंत आहे. या वेळात तुम्ही केव्हाही गणरायाची मूर्ती स्थापन करू शकता.

गौरी आवाहन, पूजन आणि विसर्जन कधी?

२०२४ मध्ये १० सप्टेंबर रोजी अनुराधा नक्षत्र आहे. त्यामुळे रात्री ८.४ पर्यंत केव्हाही तुम्ही गौरी आवाहन करू शकता. दुसऱ्या दिवशी ११ सप्टेंबरला गौरी पूजन आहे. या दिवशी गौराईला तिच्या आवडीचे पदार्थ नैवेद्यात द्या. १२ सप्टेंबरला ज्येष्ठा गौरी विसर्जन आहे. रात्री ९.५३ पर्यंत तुम्ही गौरी विसर्जन करू शकता.

मूर्ती घरी आणल्यावर करू नका 'या' चुका

गणरायासह गौराई घरी आल्यावर सकाळ संध्याकाळ त्यांच्यासमोर तुपाचा दिवा लावायला विसरू नका.

गौराई आणि गणपतीच्या आवडीचे सर्व पदार्थ नैवेद्याच्या थाळीमध्ये दररोज ठेवा.

बाप्पा आणि गौरी जितके दिवस तुमच्या घरी विराजमान आहेत, तितके दिवस घरात सात्विक जेवण करा.

या काळात घरात वाद आणि कटकट करू नका. अंगावर पडेल ते काम पूर्ण करा.

घरात स्वस्छता प्रसन्न वातावरण ठेवा. गणपती मूर्तीमध्ये तुम्ही शेंदूर, लाल किंवा पांढऱ्या रंगाची मूर्ती घरी आणणे फार शुभ मानले जाते.

Ganesh and Gauri Idol Sthapana Shubh Muhurt
Mangala Gauri Poojan: काय आहे मंगळागौरीचे व्रत? श्रावण महिन्यात का केलं जातं? जाणून घ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com