Viral Video: अर्रर्र... चक्क गटारात दे दणादण, लाथा-बुक्यांनी एकमेंकाना धू धू धुतले; तरुणांच्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल

Fighting Viral Video: सोशल मीडियावर सध्या दोन तरुणांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात तरुणांची जोरदार हाणामारी होत आहे.
Fighting Viral Video
Viral VideoSaam Tv
Published On

Young Boy Fighting Video: सोशल मीडियावर गेल्या काही महिन्यापासून सातत्याने तरुणाईचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतात. कधी या तरुणाईचे कौतुक व्हिडिओतून होत असते तर कधी अक्षरशा: व्हायरल व्हिडिओतून तरुणाईचा संताप होतो. सध्या सोशल मीडियावर दोन तरुणांच्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात चक्क गटाराच्या पाण्यात झोपून एकमेकांना मारत आहेत. नक्की काय घडले आहे व्हिडिओत तुम्ही पाहा.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हीला दोन तरुण एकमेंकाना मारताना दिसत आहे. मात्र भररस्त्यात नाही तर थेट कटाराता उतरुन ते एकमेंकाना मारत आहेत. अक्षरशा: घाण पाण्यात झोपवून दोघ एकमेंकाना मारत आहे. हा संपूर्ण व्हिडिओ तेथिल एका व्यक्तींने मोबाईलमध्ये कैद केलेला आहे. व्हिडिओच्या शेवटला दिसेल की काही व्यक्तींनी यांना थांबवले आहे मात्र तरीही ते हाणामारी करत आहे. मग परत हाणामारी(Fighting) करत असतात परंतू रस्त्यावर असलेल्या नागरिकांनी ती थांबवली. पंरतू हा व्हिडिओ कुठल्या शहरातील आहे हे समजू शकलेले नाही.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील '@gharkekalesh' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये,''दोन मुलांची हाणामारी'' असे व्हिडिओत काय घडले आहे ते सांगितले आहे. व्हिडिओ पोस्ट होताच मोठ्या संख्येने व्हिडिओ पाहिला गेला आहे तर बऱ्याच यूजर्संनी विविध प्रतिक्रियाही केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,'' काय हा प्रकार'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''बापरे बाप काय ती मारामारी'' तर अजून एका यूजरने लिहिले आहे की,'' पोर काय करतीस सांगता येत नाही'', अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Fighting Viral Video
Viral Cricket Fight: लाईव्ह क्रिकेट सामन्यात राडा! आधी लाथा, बुक्यांनी मारलं मग उचलून आपटलं- VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com