sangli news Saam Tv
व्हायरल न्यूज

Sangli Video: भयंकर! भररस्त्यात गळ्यावर धारधार शस्त्राने वार; सांगलीतला व्हिडीओ व्हायरल

Viral Video: सोशल मीडीयावर सध्या सांगलीमधील एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जाणून घ्या नक्की काय घडले असेल.

Tanvi Pol

Shocking Viral Video: मिरजेच्या लोणार गल्ली, विशाल फर्निचर जवळ, एका परप्रांतीय कामगाराच्या वर नशेखोर दोन तरुणांनी वाद घालून त्याच्या गळ्यावर धारधार शस्त्राने वार केल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. तर जखमी तरुणावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शंकर सुभाष मगदूम राहणार देसाई इंगळी तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव असे जखमी तरुणाचे नाव आहे. हा परप्रांतीय कामगार (Worker) जिनत कलेक्शन जवळ कट्यावर झोपण्यासाठी आला असता दोन तरुणाशी त्याचा वाद(Argument) झाला. यावेळी झालेल्या वादातून नशेखोर एका तरुणाने धारधार शस्त्राने त्याच्या गळ्यावर वार करून जखमी केले.

हा सर्व प्रकार सी सी टिव्ही मध्ये कैद झाला आहे. हल्लेखोर दोघे तरुण यावेळी पसार झाले असून जखमी शंकर मगदूम याला मिरज शासकीय रुग्णालय उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याबाबत मिरज शहर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटना स्थळी पोलीस फौज फाटा दाखल झाला होता. मिरज शहर पोलिसात आरोपींच्या वर गुन्हा नोंद झाला आहे.. हल्लेखोर तरुणांचा पोलीस शोध घेत आहेत.

व्हायरल होत असलेली संपूर्ण घटना इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ''SaamTVNews'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेली आहे. व्हिडिओ पोस्ट करण्यासोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,''मिरजेत एकाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार! नशेखोर दोघे तरुण फरार..'सध्या सर्वत्र या घटनेची चर्चा होत आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai news: मुंबई हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या

कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा

Shocking : शाळेवर पेट्रोल बॉम्ब हल्ला; अॅमस्टरडॅममध्ये उडाली मोठी खळबळ

Numerology: 'या' तारखेला जन्मलेले लोक समाजात कमावतात नाव; सूर्यदेवाची असते कृपा

Sunday Horoscope : रागावर नियंत्रण ठेवा, आर्थिक व्यवहार टाळावे; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार होणार

SCROLL FOR NEXT