Delhi-Mumbai Expressway: दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर बोगद्याचा काही भाग कोसळला; एक कामगार ठार, तीन जखमी

Kota: कोटा येथील दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर निर्माणाधीन बोगद्याचा काही भाग शनिवारी रात्री कोसळला. या अपघातात एका मजुराचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
Delhi-Mumbai Expressway
Delhi-Mumbai Expressway
Published On

राजस्थानमधील कोटा येथे रविवारी सकाळी एका निर्माणाधीन बोगद्यात मोठी दुर्घटना घडली. बोगद्याचा काही भाग कोसळला आणि ढिगाऱ्याखाली दबल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले. हा अंडरकन्स्ट्रक्शन बोगदा दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेचा भाग आहे. जखमींना उपचारासाठी कोटा शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रामगंज मंडईतील मोडक परिसरात बांधण्यात येत असलेल्या बोगद्यात हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, अपघात झाला त्यावेळी कामगार बोगद्यात काम करत होते. कामगारांनी ढिगाऱ्याखाली दबलेल्या सहकाऱ्यांना बाहेर काढले.

बाहेर काढण्यात आलेल्या कामगारांपैकी ३ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे, जखमींना उपचारासाठी कोटा शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि NHAI अधिकारी घटनास्थळी पोहोचले. NHAI नुसार, दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर मुकुंदरा व्याघ्र प्रकल्पाजवळील टेकड्यांखाली 4.9 किमी लांबीचा 8-लेन बोगदा तयार केला जात आहे.

Delhi-Mumbai Expressway
Gadchiroli: गडचिरोलीमध्ये नदीत चार मुले बुडाली; आईने तिघांचे वाचवले प्राण, एकाचा मृत्यू

डॉक्टरांनी उत्तराखंडचे रहिवासी समशेर सिंग यांना मृत घोषित केले. पोलिसांनी मृताच्या नातेवाईकांना माहिती दिली आहे. या अपघातात ठेकेदाराचा निष्काळजीपणा झाल्याचे बोलले जात आहे. कोणत्याही सुरक्षा उपकरणाशिवाय कामगारांना कामावर ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या अपघाताचा तपास सुरू आहे.

Delhi-Mumbai Expressway
Baba Adhav: ईव्हिएम विरोधात आंदोलन करणारे बाबा आढाव कोण आहेत? जाणून घ्या कारकिर्द

हा बोगदा ध्वनीरोधक असेल. म्हणजे तेथून जाणाऱ्या वाहनांचा आवाज बाहेर येणार नाही, त्यामुळे वन्यप्राण्यांना कोणताही त्रास होणार नाही. हा बोगदा ऑस्ट्रेलियन अभियंत्यांच्या देखरेखीखाली अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बांधला जात आहे, ज्याच्या बांधकामासाठी अंदाजे 1200 कोटी रुपये खर्च येणार आहे. 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. बोगद्याचा 3.3 किमी भाग डोंगराखाली आणि 1.6 किमी बाहेरील भाग काँक्रीट आणि सिमेंटचा बनविला जाईल.

Delhi-Mumbai Expressway
Pune: पुण्यात वाहतुकीत मोठा बदल, कात्रज चौकातील उड्डाणपुलामुळे अवजड वाहनांना बंदी; कोणता रस्ता बंद, कोणता सुरू?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com