Titwala Crime News : केडीएमसी कामगाराला मारहाण करत कुटुंबांला जीवे मारण्याची धमकी; जागेच्या व्यवहारातून वाद 

Kalyan News : मानिवली येथे ८७ गुंठे जागा आहे. या जागेपैकी दोन गुंठे जागा त्यांनी रमण गायकर यांना विकली होती. तीन वर्षापूर्वी रमण गायकर यांचे निधन झाले.
Titwala Crime News
Titwala Crime NewsSaam tv
Published On

अभिजित देशमुख 

कल्याण : जागेच्या व्यवहारातून झालेल्या वादातून केडीएमसीच्या कामगाराला जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. इतकेच नाही तर त्या कामगाराच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार टिटवाळा जवळील मानिवली, उंबार्णी गावात घडला आहे. या प्रकरणी टिटवाळा पोलिसात तक्रार देण्यात आली असून पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे. 

टिटवाळा (Titwala) येथील उंबार्णी गावात केडीएमसीचे कर्मचारी एकनाथ पवार हे पत्नी, मुलगी व आई यांच्यासोबत राहतात. कल्याण- डोंबिवली महापालिकेत सफाई कामगार आहेत. दरम्यान त्यांची मानिवली येथे ८७ गुंठे जागा आहे. या जागेपैकी दोन गुंठे जागा त्यांनी रमण गायकर यांना विकली होती. तीन वर्षापूर्वी रमण गायकर यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर रमण गायकर यांच्या पत्नीने एकनाथ पवार यांच्याकडे पैशाची मागणी केली. पवार यांनी सांगितले की, जागेच्या मोबदल्यात त्यांना २ लाख ११ हजार रुपये यापूर्वीच दिले आहेत. त्याचा तपशीलही एकनाथ पवार यांच्याकडे असल्याचे सांगितले. 

Titwala Crime News
Raigad News : पुण्‍यातून बेपत्ता तरुणाचा रायगडमध्ये सापडला मृतदेह; पर्यटकांना बॅग सापडल्याने झाला खुलासा

शिवीगाळ करत मारहाण 

मात्र रमण गायकर यांच्या पत्नी यांनी जागेच्या व्यवहाराची रक्कम २ लाख ११ हजार रुपये नसून २ लाख ६१ हजार रुपये असल्याचे सांगून उर्वरित पैसे देण्याबाबत तगादा लावला होता. दरम्यान पवार यांच्या जागेवर पाईप लाईन टाकण्याचे काम सुरु होते. (Crime News) त्यांना हे कळताच त्यांनी जागेच्या ठिकाणी धाव घेतली. त्यावेळी त्याठिकाणी निलेश शेलार हा त्यांच्या साथीरादारांसोबत उभा होता. एकनाथ पवार यांना पाहून निलेश शेलार याने जातीवाचक शिविगाळ करत मारहाण केली. तसेच त्यांच्या गाडीची चावी हिसकावून घेतली. निलेश शेलारचा साथीदार रवि निकम याने त्याच्या जवळची रिव्हॉल्वर काढून एकनाथ पवार यांच्या कंबरेखाली लावून एकनाथ पवार यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. 

Titwala Crime News
Thane Water Cut: ठाणेकरांनो, पाणी जपून वापरा! कधी आणि कोणत्या भागात पाणीपुरवठा राहणार बंद? वाचा डिटेल्स

पवारांच्या घराला पोलीस संरक्षण 

घडल्या प्रकाराबाबत एकनाथ पवार यांनी टिटवाळा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रार दाखल करुन निलेश शेलार याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. निलेश शेलार हा गुंड प्रवृत्तीचा इसम आहे. तो एका राजकीय पक्षाशी संबंधित आहेत. त्याच्याकडूुन माझ्या कुटुंबाच्या जिवितास धोका आहे. त्याला अटक करुन त्याच्या विराेधात कठाेर कारवाई व्हावी अशी मागणी एकनाथ पवार यांनी केली आहे. एकनाथ पवार यांच्या घराला पोलिस संरक्षण दिले आहे. दरम्यान या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com