Nashik Accident CCTV Footage:  Saamtv
व्हायरल न्यूज

Nashik Accident: दैव बलवत्तर म्हणून वाचला! ट्रकच्या धडकेत विजेचा खांब कोसळला; पुढे जे घडलं ते.. काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

Nashik Accident CCTV Footage: नाशिकमधील मिरची हॉटेलजवळ अपघात काल रात्री भीषण अपघात झाला. भरधाव ट्रक विजेच्या खांबाला धडकल्याने ही घटना घडली. या अपघातात ट्रकचालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

अभिजीत सोनावणे

नाशिक|ता. २९ एप्रिल २०२४

देव तारी त्याला कोण मारी असं म्हणतात जे काही खोटं नाही. मृत्यू कधी कोणत्या रुपाने येईल सांगता येत नाही. पण नशीबं चांगले असेल तर अनेकदा चमत्कार घडतो अन् अवघ्या काही क्षणात मृत्यूलाही चकवा दिला जातो. सध्या नाशिकमध्ये असाच एक भयंकर अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामधील थरारक घटना पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिकमधील मिरची हॉटेलजवळ अपघात काल रात्री भीषण अपघात झाला. भरधाव ट्रक विजेच्या खांबाला धडकल्याने ही घटना घडली. या अपघातात ट्रकचालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याचवेळी ट्रक शेजारुन चाललेला दुचाकीस्वार मात्र सुदैवाने बचावला.

ट्रकने धडक दिल्यानंतर रस्त्यावरील विजेचा खांब कोसळला. खांब कोसळत असतानाच त्याठिकाणाहून दुचाकीस्वार जात होता. यावेळी अगदी काही सेकंदाने त्याच्या दुचाकीवर कोसळता कोसळता वाचला. या संपूर्ण घटनेचा थरारक क्षण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

व्हायरल सीसीटीव्ही फुटेजमध्ये तुम्ही पाहू शकता की, ट्रकने रस्त्याच्या मधे असलेल्या विजेच्या खांबाला जोरदार धडक दिल्याचे दिसत आहे. ट्रकची धडक इतकी भीषण होती की विजेचा थांब रस्त्यावर कोसळतो. याचवेळी एक दुचाकीस्वार त्याठिकाणाहून जात असल्याचे दिसत आहे. कोसळणारा विजेचा खांब आणि तरुणाची दुचाकीमध्ये अवघ्या काही सेकंदाचे अंतर होते. अवघ्या एका सेकंदाने त्या तरुणाचा जीव वाचला अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Peru Benefits: हिवाळ्यात पेरू का खातात, त्याचे फायदे काय?

Maharashtra Live News Update: अशोक चव्हाण यांच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग

Sweet Dish Recipe : मुलं नेहमी गोड खाण्याचा हट्ट करतात? मग फक्त ५ मिनिटांत बनवा 'हा' हेल्दी पदार्थ

Pune Mhada: पुणे म्हाडाच्या ४१८६ घरांसाठीची सोडत पुन्हा लांबणीवर; आता नवीन तारीख काय?

Emraan Hashmi : सई ताम्हणकरनंतर 'ही' मराठमोळी अभिनेत्री इमरान हाश्मीसोबत झळकणार, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT