Wardha Firing : आतेभावाची प्रगती बघवली नाही, तरूणानं थेट गोळीबार केला; वर्ध्याच्या घटनेनं खळबळ

Wardha Firing update : राज्यात गोळीबाराच्या घटना सुरुच असल्याचे समोर आले आहे. वर्ध्यात रात्री गोळीबाराची घटना घडली. वर्ध्यात रात्री तरुणाने चुलत आतेभावावर गोळ्या झाडल्या.
Wardha Firing
Wardha Firing Saam tv

चेतन व्यास, साम टीव्ही प्रतिनिधी

वर्धा : राज्यात गोळीबाराच्या घटना सुरुच असल्याचे समोर आले आहे. वर्ध्यात रात्री गोळीबाराची घटना घडली. वर्ध्यात रात्री तरुणाने चुलत आतेभावावर गोळ्या झाडल्या. वर्ध्यातील दत्तपूर बायपास जवळ ही घटना घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे

मिळालेल्या माहितीनुसार, वर्ध्यात सोमवारी रात्री ३४ वर्षीय तरुणाने चुलत आते भावावर गोळीबार केला. या तरुणाने दत्तपूर बायबास जवळील आरोपीने तीन राऊंड फायर केले. आरोपीच्या मांडीला गोळी लागल्याची माहिती समोर आली आहे. राहुल वाघमारे असं आरोपीचं नाव आहे. हर्षल झाडे असं जखमीच नाव आहे. या गोळीबारातील जखमी हर्षल झाडे यांच्यावर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरु आहे.

Wardha Firing
Ulhasnagar Crime News : 2 वर्षांपासून पोलिसांना देत होता चकवा; अखेर गुंड हितेंद्र ठाकूरला गुजरातमध्ये अटक

नेमकं काय घडलं?

राहुलने हर्षलला दत्तपूर बायपास जवळ नेलं. त्यानंतर राहुलने हर्षललवर छोट्या बंदुकीने गोळ्या झाडल्या. आरोपीजवळ दहा गोळ्या होत्या. त्यापैकी तीन गोळ्या झाडल्या. त्यातील एक आरोपीच्या मांडीला लागली. या घटनेनंतर आरोपी फरार झाला. यानंतर हवालदार सचिन इंगोले यांना मोठ्या शीताफिने आरोपीला अटक केली. सध्या आरोपी सेवाग्राम पोलिसांच्या ताब्यात आहे.

Wardha Firing
Crime News: प्रेमाचा भयानक शेवट! लग्नासाठी प्रेयसीचा दबाव, संतापलेल्या टॅक्सी ड्रायव्हरकडून भयानक कृत्य

या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांनी दिली. मांडीवर गोळी लागताच जखमी जीव मुठीत घेऊन मुख्य रस्त्याकडे पळत होता. मात्र आरोपी गोळ्या झाडतच राहिला. जखमी हर्षल हा पळता पळता पत्नीला भेटला. त्यानंतर पत्नीने तत्काळ सेवाग्राम रुग्णालयात दाखल केले. जखमीच्या प्रगतीवर रोष असल्याने आरोपीने गोळीबार केल्याची माहिती मिळत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com