सोशल मीडियावर अनेक रिल्स व्हायरल होतात. हे रिल्स कधी चांगले असतात तर कधी धक्कादायक असतात. अनेकजण प्रसिद्धीसाठी स्वत:च्या जीवाची देखील पर्वा करत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. क्लासेसला जाणाऱ्या तरूणांचा भरधाव बुलेटवर स्ंटटबाजी करतानाचा व्हिडीओ आहे.
नागपूरमधील रामनगर परिसरातील हा व्हिडीओ आहे. हटके स्टंटबाजी करताना ही तरूण मुले दिसत आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, बुलेटवर ही मुले स्ंटट करत आहेत. या व्हिडिओत बुलेट चालवणाऱ्या मुलाने हेल्मेट घातले नाही, तर तिसरा मुलगा बुलेटच्या समोरच्या चाकावरील मडगार्डवर बसलेला दिसतोय. व्हिडीओत दिसणारे हे तरूण परीक्षेच्या तयारीसाठी क्लासला जात आहेत. दरम्यान गाडी चालवताना ही मुले अशी स्टंटबाजी करत रिल्स बनवत आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
भरधाव रस्त्यावर या तरूणांची स्टंटबाजी जिवावर बेतू शकते. कोणतेही सुरक्षा न बाळगता हे तिघे तरूण प्रवास करत आहे. बुलेटच्या मडगार्डवर बसलेल्या तरूणांचा तोल गेल्यास अपघात देखील होऊ शकतो यामुळेच तरूणांनी वाहन चालवताना योग्य ती काळजी घेणे महत्वाचे आहे.
रिल्सच्या नादात वाहतूक नियम धाब्यावर बसवत जीव धोक्यात घालणारा स्टंटबाजीचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्टंटबाजी करणाऱ्या या तरूणांचा शोध वाहतूक पोलिसांनी घेत 7 हजाराचा दंड देखील ठोठावला आहे तसेच त्यांच्या कुटुंबियाना बोलावून समज दिल्याची माहिती आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.