आजकाल सोशल मिडीयावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. असातच सध्या एक २७ सेकंदांचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. मुंबईच्या रस्त्यांवर धावणाऱ्या एका टॅक्सीतील व्हिडीओ चर्चेचा विषय ठरलाय. दुबईस्थित एनआरआय रोहित सिंह राठौर यांनी कॅबमधील SOS किंवा पॅनिक बटनाबाबत ड्रायव्हरला विचारलं असता त्यांना मिळालेल्या उत्तरामुळे प्रवासी सुरक्षेच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.
व्हायरल व्हिडिओमध्ये प्रवासी आणि चालक यांच्यात बोलणं सुरु आहे. ड्रायव्हरच्या म्हणण्यानुसार, हे पॅनिक बटन खास करून महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बसवलंय. मात्र, त्याने स्वतः एका रात्री अनेकदा बटन दाबलं तरी तातडीची मदत मिळाली नाही, असा दावा ड्रायव्हरने केला. त्यानंतर सकाळी सुमारे 6 वाजता चौकशीसाठी फोन आल्याचंही त्याने सांगितलंय. या दाव्यामुळे SOS बटन खरंच काम करतं का यावर आता प्रश्न उपस्थित होऊ लागलेत.
केंद्र सरकारच्या नियमांनुसार, 1 जानेवारी 2019 पासून सर्व कमर्शियल टॅक्सी आणि पब्लिक सर्विस वाहनांमध्ये Vehicle Location Tracking Device (VLTD) आणि पॅनिक बटन बसवणं अनिवार्य करण्यात आलंय. या प्रणालीद्वारे आपत्कालीन परिस्थितीत वाहनाची लाईव्ह लोकेशन कंट्रोल रूमला पाठवली जाते आणि तात्काळ मदत पोहोचवली जाते.
व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाल्यानंतर त्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. युजर्समध्ये मतभेद दिसून आलेत. काहींनी ड्रायव्हरच्या दावा अतिशययोक्ती असल्याचं म्हटलंय. तर अनेकांनी 'जर पॅनिक बटनच काम करत नसेल, तर महिला सुरक्षेची हमी कशी मिळणार?' असा सवाल उपस्थित केलाय.
(डिस्क्लेमर- हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये किती तथ्य आहे याची खातरजमा आम्ही करत नाही.)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.