

आजकाल भारतीय लग्नांमध्ये जेवणासाठी वेगवेगळे टेस्टी पदार्थ असतात. काहींच्या लग्नात बुफे, लाइव्ह काउंटर आणि महागडे शाही पक्वान्न पाहायला मिळतात. मात्र सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये चित्र काहीसं वेगळं पाहायला मिळतोय. या लग्नातील दृश्य सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलंय.
या लग्नात विविध आलिशान पदार्थांसोबत साध्या मॅगीचा स्टॉल लावण्यात आला होता आणि आश्चर्य म्हणजे सर्वाधिक गर्दी याच काउंटरवर पाहायला मिळाली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून लग्न समारंभातील जेवणावर नव्या चर्चा होताना दितोय.
हा व्हिडिओ आदित्य वर्मा नावाच्या यूजरने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. तो allboutaadi या अकाउंटवरून पोस्ट केलाय. व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय की, पाहुणे अगदी उत्सुकतेने मॅगी बनताना पाहत असून ती तितक्याच आवडीने त्याचा स्वादही घेतायत. मॅगी खाण्यासाठी भलीमोठी रांग देखील लागलीये.
मॅगीचं काऊंटर सोडून इतर कोणत्याही काऊंटवर गर्दी दिसत नाही. यावरून लग्नातील महागड्या पदार्थांपेक्षा साध्या आणि सर्वांना आवडणाऱ्या मॅगीचं आकर्षण अधिक असल्याचं दिसून येतंय.
व्हिडिओ शेअर करताना, कॅप्शनमध्ये 'वेडिंग प्लॅनर्स आणि केटरर्सना यापासून शिकण्याचा' सल्ला दिला. शाही पदार्थांच्या गर्दीतही मॅगीसारखी साधी डिश लोकांना आवडत असल्याने लग्नाच्या मेन्यूमध्ये याचा समावेश करणं फायदेशीर ठरेल.
या व्हिडिओवर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटताना दिसतायत. अनेक यूजर्सनी मॅगी ही सर्वांची आवडती डिश असल्याचं म्हटलंय. तर काही 'लग्नात मॅगी असली तर लग्न आणखी मजेदार होईल' अशी प्रतिक्रिया दिलीये.
(डिस्क्लेमर- हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये किती तथ्य आहे याची खातरजमा आम्ही करत नाही.)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.