Mother Heart Attack Death At Son Bday Party CCTV Footage: Saamtv
व्हायरल न्यूज

Gujrat Heart Attack: लेकाच्या 'बर्थडे पार्टी'त अटॅक आला, आईने जाग्यावर जीव सोडला; मृत्यूचा थरार CCTVत कैद; VIDEO

Gangappa Pujari

Heart Attack Due During Bday Celibration: अलिकडे हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. अगदी जेवत्या ताटावर, चालता बोलता, जीममध्ये वर्कआऊट करताना हार्ट अटॅक आल्याच्या, जाग्यवरच जीव गेल्याच्या घटना घडत आहेत. गुजरातमधून अशीच एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. गुजरातच्या वलसाड जिल्ह्यामध्ये मुलाचा बर्थडे कार्यक्रम सुरु असतानाच आईला हार्ट अटॅक आला अन् काही क्षणातच जाग्यावरच जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मन हेलावणाऱ्या घटनेचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गुजरातमधील वलसाड जिल्ह्यात हृदयविकाराच्या झटक्याने महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मुलाच्या वाढदिवसाची पार्टी साजरी करत असताना आधी हृदयविकाराचा झटका आल्याने आई बेशुद्ध झाली आणि रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. एकीकडे बर्थडेचे सेलिब्रेशन सुरु असतानाच घडलेल्या घटनेने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. ही मन हेलावणारी संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वापी येथील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये बारोट कुटुंबातील पाच वर्षांच्या मुलाची वाढदिवसाची पार्टी सुरू होती. या पार्टीत कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईक गाण्याच्या तालावर नाचत होते. बर्थडे बॉय गौरिकची आई यामिनीबेन आणि वडील स्टेजवर पार्टी एन्जॉय करत होते. त्यानंतर यामिनीबेन यांनी पतीच्या खांद्यावर डोके ठेवले आणि तिथेच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्या त्या स्टेजवरून खाली पडल्या. अचानक घडलेल्या या घटनेने संपूर्ण कुटुंबीय भयभीत झाले.

कुटुंबीयांनी त्याला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी नेले, मात्र रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या भयंकर घटनेने काही क्षणांपूर्वी उत्साह अन् आनंदी वातावरण असलेल्या त्या घरामध्ये शोकाकूल वातावरण तयार झाले. ही काळीज पिळवटून टाकणारी संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.

दरम्यान, देशात हृदयविकारांचे वाढते प्रमाण हा चिंतेचा विषय बनत चालला आहे. आधी हृदयविकाराचा झटका प्रामुख्याने वृद्धांची समस्या मानली जात होती, मात्र आता तरुणांसाठीही गंभीर धोका निर्माण झाला आहे. तज्ज्ञांच्या मते या घटनांमागे आधुनिक जीवनशैली, तणाव आणि अस्वस्थ आहार ही प्रमुख कारणे असू शकतात. यामिनीबेन यांच्या या दुःखद निधनाने संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला असून, ही घटना हृदयविकाराचे गांभीर्य समजून घेण्याचा इशाराही आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

Employees Provident Fund: PF खातेधारकांसाठी मोठी बातमी; पीएफमधून काढता येणार १ लाख रुपये

SCROLL FOR NEXT