Manoj Jarange Patil: 'संधीचे सोनं करा, नाहीतर कार्यक्रम..' मनोज जरांगेंचा फडणवीसांना मोठा इशारा; उपोषणाचा २ रा दिवस, प्रकृती खालावली!

Manoj Jarange Patil Protest 2nd Day Health Update: जरांगे यांचा अशक्तपणा वाढला असल्याने त्यांना उपचार घेण्याची विनंती यावेळी डॉक्टरांनी केली मात्र त्यासाठी त्यांनी नकार दिला. तसेच यावेळी मराठा आरक्षणावरुन त्यांनी राज्य सरकारला पुन्हा एकदा इशारा दिला आहे.
Manoj Jarange Patil: 'संधीचे सोनं करा, नाहीतर कार्यक्रम..' मनोज जरांगेंचा फडणवीसांना मोठा इशारा; उपोषणाचा २ रा दिवस, प्रकृती खालावली!
Manoj Jarange Patil On Devendra FadnavisSaam Tv
Published On

अक्षय शिंदे| जालना, ता. १८ सप्टेंबर

Manoj Jarange Patil Hunger Strike Protest Jalna: विधानसभा निव़़डणुकांच्या आधी राज्य सरकारला शेवटची संधी आहे, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आरक्षणाचे अस्त्र उपसले आहे. जालन्यामध्ये सुरु असलेल्या जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस असून त्यांची प्रकृती खालावल्याचे समोर आले. आज सकाळी आरोग्य विभागाच्या डॉक्टरांच्या पथकाने त्यांची तपासणी केली.

यावेळी जरांगे यांची शुगर डाऊन झाली असून ब्लड प्रेशर आणि ऑक्सिजन लेवल नॉर्मल असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. जरांगे यांचा अशक्तपणा वाढला असल्याने त्यांना उपचार घेण्याची विनंती यावेळी डॉक्टरांनी केली मात्र त्यासाठी त्यांनी नकार दिला. तसेच यावेळी मराठा आरक्षणावरुन त्यांनी राज्य सरकारला पुन्हा एकदा इशारा दिला आहे.

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

"एक वर्ष झालं आम्ही सरकारला सहकार्य करत आहोत. अजून किती दिवस तुम्हाला सहकार्य करायंच? फडणवीस साहेबांनी आमच्या मागणीची तातडीने अंमलबजावणी केली पाहिजे, आमच्या व्याख्येप्रमाणे सगे सोयरेची अंमलबजावणी तातडीने केली पाहिजे. तसेच हैद्राबादसह, सातारा, बाँम्हे हे तिन्ही गॅजेट दोन-तीन दिवसाच्या आत लागू करा, ही सरकारची जबाबदारी आहे. मी राजकीय भाषा बोलत नाही पण माझ्या मागण्या दोन दिवसात पूर्ण करत नाही तर येत्या काळात तुम्हाला अवघड दिवस असणार आहेत," असा थेट इशारा जरांगे पाटील यांनी दिला.

देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा...

"फडणवीस साहेबांना संधी दिली आहे त्यांनी आमच्या मागण्यांकडे विशेष लक्ष घालावे. नाहीतर मराठ्यांचे कल्याण न होऊन द्यायला फडणवीस दोषी असतील. गरिबांवर मराठ्यांवर अन्याय करणारा फडणवीसंच आहे, आम्हाला राजकारणाशी देणंघेणं नाही, पण नंतर मला पाडापाडी कशी झाली? उभे कसे केले असं म्हणायचं नाही. या दोन-तीन दिवसात सगळे विषया मार्गी लावा. संधी दिली त्याची फडणवीस साहेबांनी सोने करावे. धनगर, मुस्लिम, शेतकरी यांना सरकारने नुसतं वेड्यात काढले आहे, मागणी मान्य करा नाहीतर 2024 ला राजकीय करिअर उद्ध्वस्त करून टाकेल?" असा घणाघातही जरांगे पाटील यांनी केला.

Manoj Jarange Patil: 'संधीचे सोनं करा, नाहीतर कार्यक्रम..' मनोज जरांगेंचा फडणवीसांना मोठा इशारा; उपोषणाचा २ रा दिवस, प्रकृती खालावली!
Maharashtra Politics: रश्मी ठाकरेंचं नाव CM पदासाठी चर्चेत, किशोरी पेडणेकर यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाल्या..

2024 ला कार्यक्रम लावणार...

"भारतात अशी एकही जात नसेल की त्यांनी सरकारला वर्षभर सहकार्य केले, कशाला सत्ता चालवता. त्यांना वाईट वाटायला पाहिजे की गेली एक वर्षापासून आंदोलन सुरू आहे. मुख्यमंत्री म्हणतायेत ना पोटात काही नाही ओठात काही नाही, फडणीस यांचे ऐकून आमचा समाज संपून असं नाही ना? मी चार-पाच दिवसात राजकीय बोललो नाही फडणवीस यांना संधी दिली. तुम्ही म्हणता दुसऱ्यांना फायदा झाला, तुम्ही आरत्रण देणारच नाही तर तुम्हाला फायदा कसा होणार? मराठ्यांचे पोर गप्प बसू शकत नाही, 2024 ला कार्यक्रमच लावणार," असेही मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले.

Manoj Jarange Patil: 'संधीचे सोनं करा, नाहीतर कार्यक्रम..' मनोज जरांगेंचा फडणवीसांना मोठा इशारा; उपोषणाचा २ रा दिवस, प्रकृती खालावली!
Crime News : हत्येनंतर मुंडकं छाटलं; बाप्पाचा प्रसाद घेण्यावरून एकाला संपवलं, वाचा गुन्हेगारीच्या बातम्यांचा आढावा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com