Manoj Jarange Patil Strike : निवडणुकांच्या तोंडावर मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसणार; काय आहेत मागण्या? जाणून घ्या, VIDEO

Manoj Jarange Patil Strike update : निवडणुकांच्या तोंडावर मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. विविध मागण्यांसाठी जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलं आहे.

जालना : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सहाव्यांदा आमरण उपोषणाला बसणार आहेत. आज सोमवारी मध्यरात्री बारा वाजल्यापासून आमरण उपोषणाला बसणार आहेत. पहिलं उपोषण त्यांनी मागील वर्षी २९ ऑगस्ट रोजी केलं होतं. त्यानंतर आता सहावं उपोषण १६ सप्टेंबर रोजी करणार आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. 'सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, हैदराबाद गॅझेटसह सातारा आणि बॉम्बे गॅझेट लागू करावं, यासह इतर मागणीसाठी उपोषण करणार आहेत. मागील पाच उपोषणात सरकारने जरांगे यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.

पहिलं उपोषण

29 ऑगस्ट

17 दिवस

-------------------

दुसरं उपोषण

25 ऑक्टोबर

9 दिवस

-------------------

तिसरे  उपोषण

10 फेब्रूवारी

17 दिवस

-------------------

चौथे उपोषण 4 जून

10 दिवस

-------------------

पाचवे उपोषण 20 जुलै

4 दिवस

-------------------

उपोषण सहावे 16 सप्टेंबर.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com