Maharashtra Next CM : मुख्यमंत्रिपदावरून महायुतीत रस्सीखेच; महाजनांनंतर आता शिंदेंच्या आमदाराचा मोठा दावा

Maharashtra Next CM : विधानसभा निवडणुकीआधी महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? याची जोरदार चर्चा सुरु आहे.
maharashtra politics
maharashtra politicsSaam TV
Published On

Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीस आमच्या मनातील मुख्यमंत्री, असे वक्तव्य भाजप नेते गिरीश महाजन यांनी केले होते. या वक्तव्यानंतर राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे. भाजप नेत्याच्या वक्तव्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनाही यावर प्रतिक्रिया दिली. छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलताना त्यांनी महाजन यांना टोला लगावला. त्याशिवाय वर्षा गायकवाड यांच्या वक्तव्याचा समाचारही घेतला.

सर्वांना वाटते आपला मुख्यमंत्री व्हावे पण याचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील, असे सांगत संजय शिरसाट यांनी महाजन यांच्या वक्तव्यावर मिश्किल टिप्पणी केली. मला वाटतं एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, मात्र मुख्यमंत्री कोण होणार? हे सर्व वरिष्ठ नेते ठरवतील, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री कोण होणार? महायुतीमध्ये रस्सीखेच

गिरीश महाजन यांच्या मनात फडणवीस हे मुख्यमंत्री व्हायला हवेत असं वाटतं, पडळकर यांच्या मनात अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत तर माझ्या मनात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे असे वाटत. मात्र अंतिम निर्णय वरिष्ठ नेते घेतील, असे शिरसाट यांनी सांगितलं.

त्याशिवाय वर्षा गायकवाड यांनीही मुख्यमंत्री पदाबाबत वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याचाही समाचार घेतला. कदाचित त्यांच्या मनात काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ नये असे असेल. नाना पटोले आणि त्यांच्यामध्ये वाद सुरू असल्याने त्यांनी सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होतील, असे वक्तव्य केले असेल, असे संजय शिरसट म्हणाले.

जागावाटपावर काय म्हणाले शिरसाट ?

महायुतीच्या दोन दिवसानंतर बैठका सुरू होणार आहेत. तिन्ही नेते बैठक घेऊन कोण किती जागा लढव्याच्या ते ठरवतील. काही नावाची लवकरच घोषणाही करणार आहेत. मजबुतीने सरकार आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

गणपती विसर्जन झाले आहे. आता दोन दिवसांनंतर युतीच्या बैठका सुरू होत आहेत. कुणी किती जागा लढवायच्या यावर चर्चा आणि नावे जाहीर होणार आहेत.नेते घोषणा करणार आहेत. आठ दिवसात उमेदवार घोषणा होतील. मजबूत सरकार आणण्यासाठी महायुतीचे प्रयत्न सुरू आहेत, असे शिरसाट म्हणाले.

अनिल बोंडेंच्या वक्तव्यावर काय म्हणाले ?

अनिल बोंडे यांनी संताप व्यक्त केला मात्र काहीना अतिरेक वाटतो. राहुल गांधी परदेशात जाऊन भारत देशविरोधी आणि आरक्षणाविषयी बदनामी करत असे बोलत असतील तर या भारतीयांच्या भावना दुखवतात. अनिल बोंडे असो किंवा संजय गायकवाड यांचा संताप आहे, असे शिरसाट म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com