Heart Attack: हार्ट अटॅक आल्यानंतर जोरात खोकल्यास जीव वाचण्यात होते मदत? जाणून घ्या नेमकं सत्य

Heart Attack: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक दावा करण्यात येतोय. ज्यामध्ये हार्ट अटॅक आल्यानंतर रूग्ण जोरजोरात खोकला तर त्याचा जीव वाचू शकतो. याला कफ सीपीआर असं म्हटलं जातं. दरम्यान या दाव्यात किती प्रमाणात तथ्य आहे ते पाहूयात.
Heart Attack cough cpr
Heart Attack cough cprsaam tv
Published On

सध्या हृदयाच्या आजारांच्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. हृदयविकाराचा झटका जीवघेणाही ठरू शकतो. जर एखाद्या व्यक्तीला हॉर्ट अटॅक आला असेल तर त्याला सीपीआर देऊन त्याचा जीव वाचवता येतो. मात्र अशावेळी रूग्णाला तातडीने रूग्णालयात दाखल करण्याचीही गरज असते.

तज्ज्ञांच्या म्हणण्यांनुसार, सीपीआर आणि फर्स्ट एडमुळे रूग्णाला दिलासा मिळू शकतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक दावा करण्यात येतोय. ज्यामध्ये हार्ट अटॅक आल्यानंतर रूग्ण जोरजोरात खोकला तर त्याचा जीव वाचू शकतो. याला कफ सीपीआर असं म्हटलं जातं. दरम्यान या दाव्यात किती प्रमाणात तथ्य आहे ते पाहूयात.

खरंच हार्ट अटॅकमध्ये खोकल्यास वाचू शकतो जीव?

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार हा दावा खोटा आणि चुकीचा आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, कफ सीपीआर अशी कोणतीही पद्धत नाहीये. हृदयविकाराच्या झटक्यादरम्यान, जोरात खोकल्याने रुग्णाचा जीव वाचवता येत नाही. शिवाय यावेळी जोरजोरात श्वास घेण्याचाही काही फायदा होत नाही. त्यामुळे अशा कोणत्याही पद्धतीने रूग्णाचा जीव वाचला जाऊ शकत नाही.

Heart Attack cough cpr
Infertility: ५ पैकी ३ महिलांना IVF ची गरज; प्रजनन दरातही घसरण

हार्ट अटॅक आल्यानंतर काय केलं पाहिजे?

यापूर्वी सोशल मीडियावर आणखी एक पोस्ट व्हायरल झाली होती. ज्यामध्ये हृदयविकाराचा झटका आल्यानंतर आल्याचं सेवन केल्यास रूग्णाचा जीव वाचू शकतो, असं सांगण्यात आलं होतं.

तज्ज्ञांच्या म्हणण्यांनुसार, अशा कोणत्याही दाव्यांवर विश्वास ठेवू नये. हृदयविकाराचा झटका ही एक गंभीर स्थिती असून यावेळी रुग्णाला प्रशिक्षित व्यक्तीकडून सीपीआर द्यावा. शिवाय त्याला ताबडतोब रुग्णालयात नेलं पाहिजे.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

Heart Attack cough cpr
Blood sugar level 300 symptoms : 300 पार ब्लड शुगर झाल्यावर शरीरात दिसतात 'हे' बदल, वेळीच घ्या डॉक्टरांची मदत

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com